Mumbai

जुनी पेंशन – घटनादत्त अधिकार ; न्याय मिळेपर्यंत लढा – संगीताताई शिंदे

जुनी पेंशन – घटनादत्त अधिकार ; न्याय मिळेपर्यंत लढा – संगीताताई शिंदे

आझाद मैदानावरील महाविश्वास धरणे आंदोलनाचा आज 10 वा दिवस

आज व उद्या संभाजी पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्याचे उत्कृष्ट नियोजन

मुंबई दि. 1 जानेवारी जुनी पेन्शनचा अधिकार हा घटनेनेच बहाल केला असून कोणतेही शासन घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही. आझाद मैदानावर जुन्या पेंशन साठी सुरू झालेला लढा जुनी पेंशन मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचे मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी व्यक्त केले.
आज व उद्या 1 व 2 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्याचे नियोजन असून संभाजी पाटील सर व त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षक महत्वाची भूमिका बजावीत आहेत. आंदोलनास बसलेल्या सेवानिवृत्त शिक्षक बांधवांना साथ देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून 10 शिक्षक बांधव सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर उपस्थित झाले आहे.
जुनी पेंशन ही म्हातारपणाची मजबूत काठी असून शासनाने जुन्या पेंशन बाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी आझाद मैदानावर शिक्षक बांधवांनी घोषणा सुद्धा दिल्या. नववर्षाच्या आजच्या दिवशी आझाद मैदानावर बहुसंख्य शिक्षक बांधव जुन्या पेंशन साठी एकवटले आहेत. आंदोलनाची धार आता दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत असून शासन स्तरावर व मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरूच राहणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button