?️ Big Breaking…अमळनेर येथे कोरोना रुग्णांची संख्या झाली नऊ …
अमळनेर :- तालुक्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून अमळनेर तालुक्याची हॉटस्पॉट बनले आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या नऊ असून त्या पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सात रुग्णावर उपचार सुरू आहेत.
एकाच कुटुंबातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह….
अमळनेर तालुक्यातील साळीवाडा परिसरातील दाम्पत्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या कुटूंबियांचे स्वॕब दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी धूळे येथे पाठविण्यात आले होते. आज दुपारी त्यांचा अहवाल प्राप्त झाले असून त्यांच्या कुटूंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
एकीकडे प्रशासन कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज अमळनेर तालुक्यातील एकाच कुटूंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असुन आज आणखी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.






