India

Health: आरोग्याचा मुलमंत्र..काळजी केसांची, माहिती तेलांची

Health: आरोग्याचा मुलमंत्र..काळजी केसांची, माहिती तेलांची

केस गळणं ही खूप काही टेन्शन घेण्याची गोष्ट नसते असे म्हणतात. कारण सामान्यपणे जे केस गळतात त्यांच्या जागी नवे केस येतात. पण केस गळती ही चिंतेची बाब तेव्हा होते जेव्हा केस गळण्याचं प्रमाण वाढतं, केस पातळ होतात तेव्हा. केस गळती थांबवू या नावाखाली असंख्यं तेल, औषधं, जेल, सिरम बाजारात आहेत. पण ती केस गळतीवर किती परिणामकारक ठरतात हा अभ्यासाचा विषय आहे. केस गळतीवर दुकानं किंवा मेडिकल धुंडाळत बसण्याची गरज नाही. याचा उपचार आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं तेल केसांसाठी अतिशय गुणकारी आहे. हे तेल केस गळती तर थांबवतेच शिवाय केसांचा पोत सुधारतो आणि चमकही येते.

1. केस गळतीवर परिणामकारक उपाय करायचा असेल तर मोहरीचं तेल वापरावं. तज्ज्ञ सांगतात की मोहरीच्या तेलातील पोषक तत्त्व केसांची मुळं घट्ट करतात. मोहरीच्या तेलानं टाळूला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. केसांच्या मुळांखालचा रक्तप्रवाह सुधारला की केस गळतीही कमी होते.

2. मोहरीच्या तेलात सेलेनियम, ओमेगा 3 फॅटी अँसिड आणि प्रथिनं असतात. यात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. तसेच यात ब 3 अर्थात नियासिन हा घटक असतो मोहरीच्या तेलातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक यांचं विपुल प्रमाणामुळे मोहरीचं तेल केसांसाठी पोषक ठरतं.

तसेच भृंगराज तेल सुद्धा केस गळती च्या समस्से मध्ये अत्यंत गुणकारी असते.
भृंगराज तेल बाजारातूनच आणावे अस काही नाही तर ते तेल घरी सुद्धा बनवता येते.
त्याची सामग्री आणि बनवण्याची पद्धती पुढील प्रमाणे.

सामग्री:

नारळाचे तेल : एक कप
भृंगराज पावडर : एक चमचा
मेथी दाणे : एक चमचा

बनवण्याची पद्धत :

भांड्यामध्ये एक कप नारळाचे तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मूठभर बारीक कापलेली भृंगराजची पाने किंवा एक मोठा चमचा भृंगराज पावडर मिक्स करा. यानंतर तेलात एक चमचा मेथी दाणे टाका आणि मिश्रण जवळपास पाच मिनिटांसाठी गरम करा. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या. तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि एका बाटलीमध्ये भरा.

फायदे :
भृंगराज तेलातील औषधी गुणधर्मामुळे तुटणाऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. भृंगराजमधील नैसर्गिक गुण केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत. या तेलातील पोषक घटक अधिक वाढवण्यासाठी त्यात एक मोठा चमचा शिकेकाई पावडर मिक्स करा. शिकेकाईतील गुणधर्म टाळूच्या त्वचेवरील अतिरिक्त सीबमचा स्त्राव नियंत्रणात आणण्याचे कार्य करतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
(होमिओपॅथिक तज्ञ)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button