Dharangaw

धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि.शेळके यांचा स्वागत व सन्मान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करू: ऍड. भोलाणे

धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि.शेळके यांचा स्वागत व सन्मान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करू: ऍड. भोलाणे

धरणगाव : धरणगाव पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा.शंकर शेळके साहेब यांचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. व्ही एस भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
तत्पूर्वी धरणगाव पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य मा.धर्मराज मोरे यांनी धरणगाव ग्रामीण व शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा परिचय करून दिला. यानंतर नवनियुक्त पोनि. शेळके साहेब यांनी सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत हितगुज करून परिचय जाणून घेत संवाद साधला व दिलखुलास चर्चा केली. तसेच, आतापर्यंतच्या नौकरीतला प्रवास सर्व पत्रकारांसमोर मैत्रीच्या चर्चेतून मांडला.

यावेळी ऍड. व्ही एस भोलाणे व लक्ष्मण माळी यांनी सांगितले की, आम्ही प्रशासनाला सर्वोतपरी मदत करण्यास सदैव कटिबद्ध राहू. तसेच, उपस्थित संघटनेच्या सदस्यांनी स्पष्ट केले की, आम्ही शहरात सलोखा टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू व पोलिस प्रशासनाला सहकार्य करू.

यावेळी देशोन्नतीचे धर्मराज मोरे, शौर्य मराठीचे विजयकुमार शुक्ला, देशदूतचे अधिकृत फोटोग्राफर शैलेश भाटिया, जागर जनस्थानचे भगीरथ माळी, लोकनायकचे जितेंद्र महाजन, दिव्य मराठीचे बी आर महाजन, लोकमतचे आर डी महाजन, लोकशाहीचे विनोद रोकडे, सामनाचे बाळासाहेब प्रभूदास जाधव, बाळकडूचे प्रा. मंगेश पाटील, लोकपत्रीकेचे पी डी पाटील, साईमतचे कमलाकर पाटील, लोकनायकचे योगेश पाटील, सर्कलचे निलेश पवार, महाराष्ट्र न्यूजचे सतीश शिंदे, विकास पाटील, लाईव्ह ट्रेंडचे अविनाश बाविस्कर, पुण्यप्रतापचे राजेंद्र वाघ आदी सन्माननीय उपस्थित बांधवांनी मा.शेळके साहेबांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. व सन्मानकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करू: ऍड. भोलाणेधरणगाव – धरणगाव पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा.शंकर शेळके साहेब यांचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. व्ही एस भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

तत्पूर्वी धरणगाव पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य मा.धर्मराज मोरे यांनी धरणगाव ग्रामीण व शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा परिचय करून दिला. यानंतर नवनियुक्त पोनि. शेळके साहेब यांनी सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत हितगुज करून परिचय जाणून घेत संवाद साधला व दिलखुलास चर्चा केली. तसेच, आतापर्यंतच्या नौकरीतला प्रवास सर्व पत्रकारांसमोर मैत्रीच्या चर्चेतून मांडला.
यावेळी ऍड. व्ही एस भोलाणे व लक्ष्मण माळी यांनी सांगितले की, आम्ही प्रशासनाला सर्वोतपरी मदत करण्यास सदैव कटिबद्ध राहू. तसेच, उपस्थित संघटनेच्या सदस्यांनी स्पष्ट केले की, आम्ही शहरात सलोखा टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू व पोलिस प्रशासनाला सहकार्य करू.
यावेळी देशोन्नतीचे धर्मराज मोरे, शौर्य मराठीचे विजयकुमार शुक्ला, देशदूतचे अधिकृत फोटोग्राफर शैलेश भाटिया, जागर जनस्थानचे भगीरथ माळी, लोकनायकचे जितेंद्र महाजन, दिव्य मराठीचे बी आर महाजन, लोकमतचे आर डी महाजन, लोकशाहीचे विनोद रोकडे, सामनाचे बाळासाहेब प्रभूदास जाधव, बाळकडूचे प्रा. मंगेश पाटील, लोकपत्रीकेचे पी डी पाटील, साईमतचे कमलाकर पाटील, लोकनायकचे योगेश पाटील, सर्कलचे निलेश पवार, महाराष्ट्र न्यूजचे सतीश शिंदे, विकास पाटील, लाईव्ह ट्रेंडचे अविनाश बाविस्कर, पुण्यप्रतापचे राजेंद्र वाघ आदी सन्माननीय उपस्थित बांधवांनी मा.शेळके साहेबांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button