Nashik

ग्राफलिंग कुस्ती स्पर्धेसाठी जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ग्राफलिंग कुस्ती स्पर्धेसाठी जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

– सुनिल घुमरे नासिक दिंडोरी प्रतिनिधी
ग्राफलिंग कुस्ती स्पर्धेसाठी जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक 15 ते 17 जुलै 2022 रोजी मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे झालेल्या १० व्या राज्यस्तरीय ग्राफलिंग कुस्ती स्पर्धेत जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी, विद्यालयाचे विद्यार्थी कु .ऋषिकेश भिकनराव देशमुख ९वी ई सिल्वर मेडल व पुष्कराज ज्ञानेश्वर मोरे ९वी ई गोल्ड मेडल या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय बक्षीस मिळाले.
दिनांक 18 ते 21 ऑगस्ट 2022 रोजी पुढील महिन्यात पानिपत, हरियाणा , येथे राष्ट्रीय ग्राफलिग कुस्ती स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली.या विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे प्राचार्य आर सी वडजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस श्रीम. निलीमाताई पवार . मविप्र अध्यक्ष डॉ.तुषार दादा शेवाळे , सर्व कार्यकारिणी पदाधिकारी ,कार्यकारी संचालक दत्तात्रय दादा पाटील , माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव ,उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष अनिल दादा देशमुख, अभिनव बालविकास मंदिर विभागाचे अध्यक्ष रघुनाथ मामा गायकवाड विद्यालयाचे प्राचार्य रमेश वडजे यांनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य सोपान वाटपाडे पर्यवेक्षक डॉ जी व्ही अंभोरे,आर व्ही मोकळ , श्रीमती एन पी चौधरी ,क्रीडा शिक्षक एस बी मोगल ,बी जे देवरे ,जे के आहेर, शरद आहेर आदींचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button