Maharashtra

अमळनेर तालुका फोटोग्राफर असोशिएशन तर्फे तहसीलदार यांना निवेदन

अमळनेर तालुका फोटोग्राफर असोशिएशन तर्फे तहसीलदार यांना निवेदन

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर येथील कोरोना या महामारी आजारामुळे फोटो ग्राफर बांधवांचे झालेल्या अतोनात नुकसान होत आहे आज फोटोग्राफर बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जुन या कालावधीत लग्न समारंभ खुप
मोठया प्रमाणात होत असतात. परंतु सरकारी आदेशाप्रमाणे लॉकडाऊन असल्यामुळे काहींनी हे समारंभ थोडक्यातच आटोपले. त्यामुळे फोटोग्राफर बांधवांवर उपास मारीची वेळ आली आहे. दरम्यानच्या काळात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, ७ महिने या काळात कुठलेही काम नसल्याने विवचनेत आहेत.लग्न सराईत जमावलेल्या तुटपुंज्या रक्कमेत आपला घर खर्च भागवित असतात. परंतु लॉकडाऊन मुळे हे सर्व बंद झाले आहेत. स्वतः जवळ असलेली रक्कम घर खर्चात संपली आहे. बरेचशे फोटोग्राफर बांधवांनी बँकेकडून कॅमेरा खरेदीसाठी कर्ज, गृह कर्ज, मुलाचे शिक्षणासाठी कर्ज, घेतले आहे. व या भयंकर परिस्थितीत काय करावे हे सुचत नाही. तरी माय-बाप शासनाने या गंभिर परिस्थीतीचा विचार करुन शासन स्तरावर फोटोग्राफर व त्या निगडीत व्यवसाय करणार्या बांधवांना काही आर्थिक मदत मिळावी . याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
संपूर्ण महाराष्ट्रात या व्यवसायावर उपजिविका करणारे असंख्य फोटोग्राफर बांधव आहेत. व त्यांच्या मागे परिवार सुध्दा आहे. व अशा भयानक परिस्थितीतुन शासन काही मदत करेल या आशेने हा वर्ग पहात आहे. तरी फोटोग्राफर बांधवांची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे.यावेळी महेंद्र पाटील, दीपक बारी,मनोज चित्ते,इ उपस्थित होते.निवेदनाच्या प्रति मा.उपमुख्यमंत्री साो., महाराष्ट्र राज्य, मुंबई ,मा.पालकमंत्री साो., महाराष्ट्र राज्य, मुंबई।,मा.अन्नपुरवठा मंत्री सा., महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा.जिल्हाधिकारी सा., जळगांव जि.जळगांव,मा.आमदार सा. अमळनेर विधानसभा, अमळनेर मा.आमदार सा., विधान परिषद मा.तहसिलदार, साो., अमळनेर जि.जळगांव यांना देण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button