Faijpur

फैजपूर शहरात गणपती उत्सव व मोहरमनिमित्त पोलिसांतर्फे रूटमार्च …

फैजपूर शहरात गणपती उत्सव व मोहरमनिमित्त पोलिसांतर्फे रूटमार्च

सलीम पिंजारी

फैजपूर– कोरोना विषाणू माहामारीच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरासह परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव व मोहरम मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने फैजपूर पोलिस,आर ए एफ व होमगार्ड यांच्या वतीने आज दि २४ सोमवारी सकाळी फैजपूर शहरात पथसंचलन करण्यात आले.

सकाळी अकरा वाजता फैजपूर पोलीस ठाण्यापासून न्हावी दरवाजा ते सुभाष चौक,अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्ग छत्री चौक ते बसस्थानक जवळील खंडोबा देवस्थान प्रवेश द्वार लेंडी मार्गे परत पोलीस ठाणे असे पथसंचलन करण्यात आले यावेळी पथसंचलनात आर ए एफ च्या शंभर जवानांसह फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, आर ए एफ चे अधिकारी सारंग सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरक्षक प्रकाश वानखडे,पोलिस उपनिरक्षक रोहिदास ठोंबरे,गोपनीय पोलीस यशवंत टहाकळे, मोहन लोखंडे आर ए एफ चे जवान,फैजपूर पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button