Amalner

अमळनेर:प्लास्टिक विक्रेत्या दुकानदारांवर न प ची कार्यवाही..!

अमळनेर:प्लास्टिक विक्रेत्या दुकानदारांवर न प ची कार्यवाही..!

अमळनेर येथील नगरपरिषदेच्या आरोग्य पथकाने दोन प्लास्टिक विक्रेत्यांवर कार्यवाही केली आहे.या कार्यवाहीमुळे व्यापारी व विक्रेत्यामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशान्वये बाजारपेठेत
नगरपरिषदेच्या पथकाने छापा टाकून जगदीश नांगो चौधरी व मुश्ताक बागवान या दोन प्लास्टिक विक्री करताना रंगेहाथ पकडले. जगदीश नागो चौधरी यांनी ५ हजार दंड भरला व मुश्ताक बागवान याने दंड भरण्यास नकार दिला म्हणून त्याच्या विरुद्ध नगरपरिषदे मार्फत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर पथकात स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण, स्वच्छता निरीक्षक संतोष बिन्हाडे, स्वच्छता निरीक्षक अरंविद कदम, ज्ञानेश्वर संदानशिव, शांताराम संदानशिव गोपाल बि-हाडे इ चा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button