Rawer

सावदा येथील श्री.नितीन बी.चौधरी (नीरज सर) व निंभोरा येथील श्री.गोकुळ भोई सर व खिर्डी येथील श्री.प्रदिप देहाडे सर यांचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात यशस्वीरित्या सहभाग

सावदा येथील श्री.नितीन बी.चौधरी (नीरज सर) व निंभोरा येथील श्री.गोकुळ भोई सर व खिर्डी येथील श्री.प्रदिप देहाडे सर यांचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात यशस्वीरित्या सहभाग

संदिप कोळी रावेर

रावेर : वा.कृ.पाटील माध्यमिक विद्यालय मस्कावद येथील शिक्षक- व इंग्लिश टिचर्स असोशिअनचे रावेर तालुका अध्यक्ष व इंग्लिश टिचर्ससाठी चेस प्रशिक्षणाचे रावेर तालुका मॉडरेटर श्री. नितीन बी.चौधरी (नीरजसर) ; तसेच सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयाच निंभोरा चे शिक्षक गोकुळ भोई सर तसेच अ.भा.पाटील माध्यमिक विद्यालय खिर्डी येथील श्री.प्रदिप देहाडे सर यांनी ईको ट्रेनिंग सेंटर स्वीडन,प्रादेशिक विद्याप्राधिकरण नाशिक आणि बांग्लादेश एलिमंटरी एज्युकेशन इन्स्टिट्युट आयोजित इंडिया-बांग्लादेश इंटरनॅशनल टिचर्स टेलिकोलॅबोरेशन प्रोजेक्ट २०२१ मध्ये सहभागी होऊन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पुर्ण केला.
या प्रोजेक्ट मध्ये भारत आणि बांग्लादेश या दोघ देशांमधील सांस्कृतिक ,भौगोलिक ,शैक्षणिक ,
ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या अनुशंगाने शाश्वत विकासाच्या ध्येयांविषयी निंभोरा येथील सौ.डि.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयातील शिक्षक गोकुळ भोई सर IND85 तसेच भाटखेडा येथील जगदीश पाटील सर IND39 व बांग्लादेश येथील प्रा.मो.हबीबुर रहमानBAN77 यांनी आॅनलाईन झूम सेशनच्या माध्यमातुन संवाद साधला. तसेच वा.कृ.पाटील.माध्यमिक विद्यालय येथील नितीन चौधरी सर IND58 तसेच नितीन सैतवाल सर IND66 यांच्या सोबत बांग्लादेश येथील सलमा बेगम मॅडम BAN35 यांनी तसेच अ.भा पाटील विद्यालय खिर्डी येथील प्रदिप देहाडे सर IND61 व त्यांचे बांग्लादेशी पार्टनर फरीहा उलफत BAN119 यांनी आॅनलाईन झूम सेशन च्या माध्यमातुन संवाद साधत ठरवून दिलेल्या विकासाच्या ध्येयांवर चर्चा केली.
या आंतरराष्ट्रीय टेलिकोलॅबोरेशन प्रोजेक्ट साठी एकुन १६ आॅनलाईन झूम सेशनचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व सेशन दरम्यान युनोने२०१५ मध्ये जागतिक पातळीवर शाश्वत विकासासाठी १७ ध्येय निश्चित करून २०३० पर्यंत पुर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. या १७ ध्येयांपैकी भूक निर्मुलन (झिरो हंगर), दारिद्र्य निर्मुलन ,( इलिमिनेशन पाॅव्हर्टि), आरोग्य(हेल्थ) , गुणवत्तापुर्ण शिक्षण (क्वालिटी एज्युकेशन),लिंग समानता (जेन्डर इक्विटी ) , शुद्ध पाण्याची उपलब्धता व सांडपाण्याची व्यवस्था ( क्लिअर वाॅटर अॅन्ड सॅनिटेशन ) तसेच असमानता कमी करणे (रिड्युस इनईक्वॅलिटी) या सात ध्येयां विषयी १६ सत्रांचे झूम मिटिंग द्वारेआॅनलाईन पद्घतीने आयोजन करण्यात आले होते.
या आंतरराष्ट्रीय टेलिकोलॅबोरेशन प्रोजेक्टचे भारताचे राष्ट्रीय समन्वयक प्रा.योगेश सोनवणे साहेब ( डाएट,नाशिक) व जळगाव जिल्हा
इंग्लिश टिचर्स वेलफेअर असोशिअनचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ तसेच बांग्लादेशचे समन्वयक प्रा.सामसुद्दिन तालुकदार व आयशा सिद्दिका मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button