बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत कुमारी हर्षाली पाटीलचे यश..
संदिप कोळी निंभोरा बु. ता. रावेर:
रावेर : बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत २३ जानेवारी २०२१ रोजी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऐनपुर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कुमारी हर्षाली विनोद पाटील इयत्ता ११ वी ब मधील विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला असुन तिला ज्युनिअर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले.आज दि.१२ मे रोजी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.पाटील यांचे मार्फत धनादेश देण्यात आला.त्यावेळेस शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.आर.जे.पाटील, पर्यवेक्षक श्री.एस.डी.चौधरी तसेच शाळेचे ज्येष्ठ शिपाई श्री.ए.डी.देशमुख व श्री.ए.डी.सपकाळे हजर होते.शाळेच्या सर्व संचालकांनी कुमारी हर्षाली विनोद पाटील या विद्यार्थिनीचे अभीनंदन केले, ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षीका तसेच माध्यमीक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु भगीनींनी देखील अभीनंदन केले व भावी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या .






