सावदा परिसर पत्रकार संघ अध्यक्षपदी भानुदास भारंबे
फैजपुर : प्रतिनिधी सलीम पिंजारी
सावदा येथील ममता नर्सरी वरती पार पडलेल्या बैठकीत सन २०२० -2021ची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यासाठी बैठक संपन्न झाली,सदर प्रसंगी बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली तत्पूर्वी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ ,हार अर्पण करण्यात आला, यावेळी सावदा प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ अनिता येवले अध्यक्ष स्थानी होत्या ,ए पी आय राहुल वाघ ,सिमरन वानखेडे,फारुख शेख, उपस्थित होते यावेळी सिमरन वानखेडे राहुल वाघ व नगराध्यक्ष अनिता येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकारान मधून प्रवीण पाटील यांनी बाळकृष्ण जांभेकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली या वेळी सावदा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भानूदास भारंबे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष पंकज पाटील उपाध्यक्ष रोशन वाघुळदे. सचिव रवींद्र हिवरकर ,यांची एकमताने निवड करण्यात आली. सदस्य जितेंद्र कुलकर्णी , प्रवीण पाटील ,कैलास लवंगडे.राजु भारंबे सुरेश बेंडाळे. शाम पाटील. लाला कोष्टी ,कैलास परदेशी, दिपक श्रावगे ,साजिद शेख,आत्माराम तायडे,भरत हिवरे, राजेंद्र दिपके,नंदू अग्रवाल, यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यातआली मावळते अध्यक्ष पिंटू कुलकर्णी व सदस्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ,शाम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ,भारत हिवरे यांनी आभार व्यक्त करीत कार्यकारणी जाहीर झाली असे सुचवत बैठक संपन्न झाल्याचे घोषित केले.मक्ताईनगर मतदार संघाचे आ, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार दीना निमित्त सर्व पत्रकारांना फोन वरून शुभेच्छा दिल्या,






