Amalner

?️ अमळनेर कट्टा..Breaking…सडावन येथे वाळू माफियाचे जेसीबी आणि डंपर पकडले..!जागेवर तोडी..!अबब..!एक पेटी..!डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराने सावध व्हावे..!

?️ अमळनेर कट्टा..Breaking…सडावन येथे वाळू माफियाचे जेसीबी आणि डंपर पकडले..!जागेवर तोडी..!एक पेटी..!

मांजराला वाटते की डोळे मिटून दूध पितो आहे कोणाला समजणार नाही पण डोळे फक्त त्याचेच बंद असतात इतरांचे उघडे असतात हे मांजराने विसरू नये….

अमळनेर येथे चहू बाजुंनी वाळू माफिया अवैध वाळू उपसा करत असतात.या संदर्भात अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर आणि स्थानिक पातळीवर करण्यात आल्या आहेत. परंतु स्थानिक प्रशासन वारंवार वाळू ?माफियांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यवाही दाखविण्यासाठी,कागद रंगविण्यासाठी लहान सहान ट्रॅकटर धारकांवर कार्यवाही केली जाते. परंतु मोठ्या वाळू माफियांना स्थानिक प्रशासन हात लावत नाही किंवा त्यांना घाबरते हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट चित्र तालुक्यात दिसत आहे. अगदी बैलगाडी मधून वाळू नेणाऱ्या अगदी मामुली व्यक्ती स स्वतः उपविभागीय अधिकारी पकडतात म्हणजे काय..?

पण आताच हाती आलेल्या बातमीनुसार सडावन ता अमळनेर येथील नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारे जेसीबी आणि डंपर पकण्यात आले होते. ही घटना साधारणपणे 1 वाजेची असून तात्काळ जागेवरच एक पेटीची तोडी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हे जेसीबी आणि डंपर “वाळूचा बाळू” चे असल्याचे देखील समजले आहे. डंपर पकडणाऱ्या कारवाई पथकाची देखील माहिती उपलब्ध आहे. पण इथे मी देत नाही पण समझनें वालों को इशारा काफी हैं…

पण असेच जर अवैध धंदे करणाऱ्या लोकांना सोडून द्यायचे असते,भ्रष्टाचार करायचा असतो तर पकडण्याचं नाटक फक्त पैसा कमविण्यासाठी च केला जात आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. मांजराला वाटते की मी डोळे मिटून दूध पितो पण डोळे फक्त मांजराचेच बंद असतात इतरांचे उघडे असतात हे मांजराने विसरू नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button