Dhule

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे धुळे येथे मोर्चा आणि निवेदन

 आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे धुळे येथे मोर्चा आणि निवेदन

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे धुळे येथे मोर्चा आणि निवेदन

धुळे प्रतिनिधी 
        राज्याच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतकांच्या मानधनात तिप्पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे दि. 26 ऑगष्ट 2019 रोजी पाठविला आहे. सदर प्रस्ताव आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर करून त्वरित शासकीय आदेश(जीआर) काढण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतकांनी आज दि.11 सप्टेंबर 2019 रोजी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील व उपाध्यक्ष युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे धुळे येथे मोर्चा आणि निवेदन
         मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. संजय गायकवाड यांना शिष्टमंडळाने दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व युवराज बैसाणे यांनी केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी अमोल बैसाणे,रविंद्र ब्राम्हणे,प्रतिभा ठाकूर, आशा मैराळे,सरला पाटील,सुनिता चौधरी, अरूणा देशमुख यांनी प्रयत्न केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button