Amalner

गोळीबार प्रकराणातील दोन्ही संशयित अटक करण्यात पोलिसांना यश

गोळीबार प्रकराणातील दोन्ही संशयित अटक करण्यात पोलिसांना यश

अमळनेर: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी अमळनेर शहरात व्यापारी पिता पुत्रावर गोळी झाडून लुटण्याचा प्रयन्त करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित अमळनेर जिल्हा पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले,उप पोलिस अधीक्षक गोरे ,उपविभाग पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या पथकाने दोन संशयित ताब्यात घेतले आहेत.

सदर घटना व्यापारासाठी पैसे जमा करण्यासाठी केले असल्याचे संशयित तरुणांनी कबूल केले आहे असे पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक गोरे साहेब व अमळनेर पोलिस निरीक्षक अम्बादास मोरे यांनी माहिती दिली.

लूटमार करण्यासाठी अमळनेर मधील एका व्यापा-यावर फायरिंग करण्यात आली होती या गंभीर गुह्यचा अमळनेर पोलिसांनी यशस्वी तपास करुन 12 वी सायन्सचा विद्यार्थी निखिल कैलास पाटिल,रा.मांडल,वय 19 आणि योगेश शाम दाभाडे रा:अमलनेर,व्य 20 वर्ष यांना ताब्यात घेतले.त्यांच्या तब्यतून 2 चाकू,1 गावठी कट्टा व 1 काडतुस ताब्यात घेतले आहे.हे दोन संशयित तरुण असून आपल्या पाल्ल्याकडे पालकांनी लक्ष्य द्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.यातील एक आरोपीला या व्यापारा ची दैनंदिन माहिती होती असा पोलिसांनी दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक गोर,डी वाय एस पी ससाणे व पोलिस निरीक्षक अम्बादास मोरे हे हजर होते. पुढील अधिक तपासकामी विजय माळी,शरद पाटील,हितेश चिंचोले, संजय पाटील, भटुसिंग तोमर पो.हवालदार आदि रवाना झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button