Bollywood

जुबिनच्या रातां लंबियाची..आफ्रिकेत धामधूम..!सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल..

जुबिनच्या रातां लंबियाची..आफ्रिकेत धामधूम..!सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल..

आफ्रिका संगीत हे भाषा प्रदेश देश आणि कोणत्याही सीमा न ओळखता मना पर्यंत पोहचू शकते.सध्या सोशल मीडियामुळे एका सेकंदात तुम्ही संपूर्ण जगात पोहचू शकतात.सोशल मिडिया च्या माध्यमातून संपूर्ण जग जवळ आले आहे. संगीतात तर प्रचंड जादू आहे.उत्तम संगीत आणि आवाज हृदयालाभ भिडणारा असतो याचाच प्रत्यय आला आहे. जुबिन नौटियाल ने गायलेले शेरशहा या चित्रपटातील गाणे रातां लंबिया..लंबिया..हे साता समुद्रा पार पोहचून आफ्रिकेत लोकप्रिय झाले आहे.सध्या इन्स्टाग्राम वर आफ्रिकेतील तरुण तरुणी बॉलिवूड मधील हिंदी गाणे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या बॉलीवूड चित्रपटातील रातां लांबियां या गाण्यावर दोघेही आपल्याच स्टाईलमध्ये परफॉर्म करत आहेत. शेरशाह चित्रपटातील हे गाणे भारतातच नव्हे तर परदेशात देखील लोकप्रिय झाले आहे.
हा व्हिडीओ किली पॉलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.आतापर्यंत या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button