Amalner

Amalner: हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न

Amalner: हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखेची सहविचार सभा अमळनेर येथे संपन्न झाली.
हिंदी अध्यापक मंडळ गेली दहा वर्षांपासून कार्यरत आहे. आजतागायत हिंदी अध्यापक मंडळांने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.
सहविचार सभेचे प्रस्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे यांनी आगामी काळात राबवायचे उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा केली.
सहविचार सभेत खालील विषय घेण्यात आले.
1) कोविड काळात ज्याचे निधन झाले आहे अशा हिंदी अध्यापक आणि इतर शिक्षकांना श्रद्धांजली वाहिली गेली.
2) सेवानिवृत्ती झालेल्या हिंदी शिक्षकांचा सत्कार करण्याचा ठराव मंजूर झाला .
3)तालुक्यातील 3 हिंदी शिक्षिकाचा कार्यकारणी सहभागी करण्याचा ठराव मंजूर झाला
4)जीवन गौरव पुरस्कारसाठी शिक्षकांमधून दोन शिक्षकांची निवड झाली.
5)भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि 14 सप्टेंबर हिंदी दिवस निमित्त तालुका स्तरीय निबंध स्पर्धा घेण्यासाठीचा निर्णय झाला.
जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी, सचिव दिलीप पाटील, मार्गदर्शक मनीष उघडे, सोपान भवरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, पुरस्कार प्रतियोगी सदस्य कमलाकर संदानशिव, मुनाफ तडवी, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांनी कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले.
सहविचार सभेचे सूत्रसंचालन हिंदी अध्यापक मंडळाचे सचिव दिलीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मानले.
शेवटी तालुकाध्यक्ष आशिष शिंदे यांचा हिंदी अध्यापक मंडळच्या कार्यकारिणीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button