Maharashtra

गरबा नृत्यात तल्लीन झाले युवक व युवती

गरबा नृत्यात तल्लीन झाले युवक व युवती

गरबा नृत्यात तल्लीन झाले युवक व युवती

चाळीसगाव मनोज भोसले
गरबा हा भारतातील प्रचंड लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. सामूहिक स्वरूपात खेळला जाणारा गरबा महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो .गरबा नृत्याची स्पर्धा मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सिताराम पहेलवान मळा येथे एकदंत कला महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केली गेली होती. 

गरबा नृत्यात तल्लीन झाले युवक व युवती

स्पर्धेसाठी दुपारी गरबा नृत्य शिकवण्याचे प्रशिक्षण घेतले गेले. त्यानंतर सायंकाळी सिताराम पहेलवान मळा येथे गरबा स्पर्धा घेण्यात आली. गरबा नृत्यामध्ये युवक-युवती तल्लीन झाले होते. या गरबा नृत्याच्या कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशांना वंदन करून झाली. यानिमित्ताने संयोजक मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले की, “चाळीसगाव तालुक्यातील युवक-युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रत्येकाला आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी दिली जावी, याच उद्देशाने या महोत्सवांतर्गत गरबा नृत्याची स्पर्धा ठेवली गेली आहे. गरबा नृत्य हे माणसाच्या सामूहिक विकासाला पोषक असे नृत्य आहे. एकमेकाला साथ देत या हे गरबा नृत्य करता येते. खूप मोठ्या प्रमाणावर युवक-युवतींचा तसेच आबालवृद्धांचा ही या ठिकाणी सहभाग आहे”. असे सांगितले.
गरबा नृत्याचे प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये 250 इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवला तर सायंकाळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 300 युवक-युवती यांनी सहभाग घेतला. यातून प्रथम व द्वितीय अशी दोन पारितोषिक मिळणार असून त्याची घोषणा 12 तारखेला होणार आहे.
गरबा नृत्य वर्कशॉप व गरबा नृत्य स्पर्धेचे परीक्षण P.D.S. गृप नाशिक, यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास शरद मोराणकर, महेंद्र पाटील पंकज देवकर, संग्राम शिंदे, अ‍ॅड.धनंजयजी ठोके, पोतदार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उपाध्याय मॅडम, माजी पं.स.सदस्य सतिष पाटे, नगरसेविका विजया पवार, वैशाली राजपूत, संगीता गवळी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, बापु अहिरे, चंदु तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, निलेश महाराज, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, नांद्रे च्या सरपंच अनुराधा पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, दक्षता समिती सदस्य हर्षल पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र वाघ, सचिन दायमा, अजय जोशी आदी उपस्थित होते.
एकदंत कला महोत्सवाला तालुक्याभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक लोकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 ह्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भावेश कोठावदे यांनी केले.
#गरबा_स्पर्धा #चाळीसगांवचा_एकदंत_2019

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button