Mumbai Diary: आता मुख्यमंत्री शिंदे देखील दसरा मेळावा..!मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना गणेशोत्सव नंतर मिळेल निर्णय..!
मुंबई महापालिकेनं अजूनही शिवर्तीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय घेतला नसला तरी शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ज्यांना संभ्रम करायचा त्यांना करू दे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्रीही घेणार दसरा मेळावा
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज रात्री मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर यासंदर्भात बैठक पार पडणार आहे. याबैठकीत दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
दादरच्या शिवाजी पार्कऐवजी दुसऱ्या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचा विचार शिंदे गटाकडून सुरु आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संघर्ष घेण्याचं टाळलं जाणार आहे. दसरा मेळवा घ्यायचा का? कुठे आणि कधी घ्यायचा? यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
गणेशोत्सवानंतर दसरा मेळाव्यावर निर्णय?
दरम्यान, गणेशोत्सवानंतर दसरा मेळाव्यावर निर्णय होईल असे संकेत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिलेत. शिवाजी पार्कवर पारंपरिक दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या वतीने आठवडाभरापूर्वी अर्ज सादर करूनही त्याला परवानगी मिळालेली नाही.






