Maharashtra

?महत्त्वाचे…असा असेल 12 वी चा निकाल..!काय आहे सूत्र ३०:३०:४०..?

?महत्त्वाचे…असा असेल 12 वी चा निकाल..!काय आहे सूत्र ३०:३०:४०..?
सीबीएसई पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(HSC) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. कोरोनाची दुसरी लाट आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले होते.

मात्र, पुढील शिक्षणासाठी १२ वीचे गुण महत्वाचे असल्याने निकाल कोणत्या निकषांवर लावण्यात येणार याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. दरम्यान, आता बारावीच्या निकालांचा निकष ठरला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे.

राज्य शिक्षण मंडळाने बारावी निकालाचे निकष सीबीएसई मंडळाप्रमाणे ३०:३०:४० या सूत्रावर आधारित असतील, असे म्हटले आहे. प्रत्येक महाविद्यालयाकडून निकालासाठी निकाल समिती स्थापन करण्यात येणार असून, निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल.

इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ३० टक्के, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ३० टक्के, इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण ४० टक्के असे निकष ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाकडून निकलासाठी मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्यासह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button