Pandharpur

पाणी वाचवण्यासाठी उजनी संघर्ष समिती वाजवणार आमदारांच्या दारात हलग्या : अतुल खुपसे पाटील मंगळवेढा 35 गाव पाणी संघर्ष समितीची बैठक

पाणी वाचवण्यासाठी उजनी संघर्ष समिती वाजवणार आमदारांच्या दारात हलग्या : अतुल खुपसे पाटील
मंगळवेढा 35 गाव पाणी संघर्ष समितीची बैठक
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : उजनी हे सोलापूरकरांच्या हक्काचे धरण आहे. या उजनी वर जिल्ह्यातील कुणाचाही अधिकार नाही. असे असताना देखील बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्यावर जाणून-बुजून अन्याय केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यातील एकही आमदार छातीठोकपणे बोलायला तयार नाही. म्हणून या आमदारांना जागे करण्यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन दि. १७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या दारात हलग्या वाजून त्यांना जागे करणार असल्याचे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.मंगळवेढा ३५ गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची बैठक हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे आयोजित केली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सचिव माऊली हळणवर, उपाध्यक्ष ॲड. बापुराव मेटकरी, सदस्य धनाजी गडदे, दिपक भोसले, दिपक वाडदेकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना दीपक भोसले म्हणाले की सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद न देण्यामागे महा विकास आघाडीचे षड्यंत्र उघडे पडले आहे जिल्ह्याला जर मंत्रीपद दिले असते तर कदाचित याला विरोध केला असता. मात्र आज ५ टी.एम.सी. पाणी चोरून नेण्याचा निर्णय होईपर्यंत एकालाही माहीत नव्हते. आणि आज माहित झाले तर कोणी तोंड उघडायला तयार नाही. त्यामुळे हे पाच टी.एम.सी. पाणी आमच्या हक्काचा आहे. प्रसंगी पाण्यासाठी रक्तपात झाला तरी चालेल, आम्ही जिवाला जपणारे नाही, मात्र आम्ही पाणी जाऊ देणार नाही असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी किरण भांगे, रुक्मिणी दोलतडे, मेजर बिराप्पा दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी, यल्लाप्पा पडवळे, भागवत सुमते, संतोष मेटकरी, संतोष मेटकरी, नवनाथ पुजारी, विनायक पुजारी, शामराव रेवे, यशवंत बीचुकले, देवा पुजारी, ओंकार पडवळे, राहुल शिंदे, महादेव शिंदे, वसंत अमनगे, समाधान मेटकरी, आनंदा पुजारी, देवाप्पा पुजारी, दत्ता काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट :
आमच्यावर गोळ्या झाडा
– उजनी मध्ये पाणी शिल्लक नसताना केवळ सोलापूर जिल्ह्याला वेठीस धरायचे म्हणून पाणी उचलण्याचा डावआखला जात आहे. तो आम्ही कधीही सहन करणार नाही. उजनी जलाशय फक्त सोलापूरकरांच्या हक्कांची आहे. या उजनी जलाशयावर फक्त सोलापुरातील शेतकऱ्यांचाच अधिकार आहे. त्यामुळे बारामतीकरांनी उजनीच्या नादी लागू नये. आम्ही कोणत्याही किमतीवर उजनीचे पाणी जाऊ देणार नाही. ज्याप्रमाणे मावळ मधील शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या त्याप्रमाणे तुम्हाला पाणी न्यायचे असेल तर सोलापुरातील शेतकऱ्यांवर गोळ्या झाडावे लागतील.
– माऊली हळणवर
सचिव, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button