Ahamdanagar

पारनेरची तहसीलदार ज्योती देवरे च्या अडचणीत वाढ…जिल्हाधिकारी यांनी दिला हा अहवाल…

पारनेरची तहसीलदार ज्योती देवरे च्या अडचणीत वाढ…जिल्हाधिकारी यांनी दिला हा अहवाल…

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना हे प्रकरण ज्या अहवालामुळे घडले तो अहवाल आता सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. त्यामुळे, ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हा आहे.

ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्टला तयार करून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला होता. या अहवालामुळे ज्योती देवरे यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं बोललं जात आहे.

अहवालात जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे की, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्य परायण ता ठेवलेली नाही, कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे.

पारनेर येथील एका कोविड सेंटर विरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी करताना तहसीलदार देवरे यांनी चौकशी समितीस कोणतेही कागदपत्र उपलब्ध करून दिली नाहीत यावरून त्यांनी कर्तव्यात, जबाबदारीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते, असे ही अहवालात नमूद आहे.

तसंच, जप्त वाळू साठ्याबाबत नियमानुसार अंतिम आदेश पारित करून सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणा करणे अभिप्रेत होते. परंतु, या प्रकरणी वाळू साठ्याच्या लिलावाबाबत अंतिम आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. ही बाब शासनाचे नुकसान करणारी असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आलेले आहेत.

फडणवीस यांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

‘ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींवर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्‍यांना पोलीस अधिकार्‍यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचार्‍यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त झाल्या आहे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार घडला आहे, असं फडणवीस पत्रात म्हणाले.

संबंधित लेख

Back to top button