Chalisgaon

प्रभावी युद्धतंत्राने महत्त्वाकांक्षेचे उत्तुंग शिखर सर करणाऱ्या शिवरायांची युद्धनीती वाखाणण्याजोगी-शिवव्याख्याते आकाश पाटील

प्रभावी युद्धतंत्राने महत्त्वाकांक्षेचे उत्तुंग शिखर सर करणाऱ्या शिवरायांची युद्धनीती वाखाणण्याजोगी-शिवव्याख्याते आकाश पाटील

मनोज भोसले

प्रभावी युद्धतंत्राने महत्त्वाकांक्षेचे उत्तुंग शिखर सर करणाऱ्या शिवरायांची युद्धनीती वाखाणण्याजोगी शिवव्याख्याते आकाश पाटील यांनी काल रोजी आयोजित कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.

अखंड हिंदुस्थानाच्या चारही बाजूंनी असलेली सुलतानी सत्ता आपल्या अमोघ सामर्थ्यातून उलथवून टाकत स्वराज्याचं अनमोल रत्न खेचून आणणारा आणि भविष्यातील ‘पेशावर ते तंजावर’ अशा विशाल हिंदवी साम्राज्याचे बीजारोपण करणारा तेजस्वी महापुरुष म्हणजे छत्रपती शिवराय राहिले असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान दादासो.श्रीराम पवार यांनी भूषविले तर मंचावर बापूसो.युवराज पाटील,नानासो.जगतसिंग सोळुंके, जिभाऊसो.नरेंद्रसिंग राजपूत व प्रभागतील नागरिक उपस्थित होते.

यावेळी सॉफ्टबॉल स्पर्धा विजेत्या जागृती शिंदे, नेहा शिंदे या विद्यार्थीनींचा आकाश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत गोसावी सर यांनी केले तर आभार दादासो. श्रीराम पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदर्श जयहिंद मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी परीसरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तर महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय राहिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button