Kolhapur

आगळ्या वेगळ्या पद्धतीने अनाथांसोबत Valentine डे केला साजरा

अनाथांना एक वेळ नि:शुल्क भोजन उपक्रमाचा खोपोलीत शुभारंभ

आगळ्या वेगळ्या पद्धतीने अनाथांसोबत Valentine डे केला साजरा

कोल्हापूरः आनिल पाटील

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या सहजसेवा फौंडेशन, खोपोली ही संस्था परिसरात निरनिराळे उपक्रम सातत्यपूर्ण राबवित आहे.मनोरुग्ण स्वच्छता माध्यमातून आपले शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा हात असणारे व खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ऍडमिट असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी 1 जानेवारी 2019 पासून दररोज सकाळी व रात्री निःशुल्क जेवण पुरवीत आहेत.याच सोबतीने थंडीत बेघर असणाऱ्या व्यक्तींना 4 वर्षांपासून ब्लॅंकेट पुरविणे,पोलीस यंत्रणेसोबत हरवलेल्या व्यक्तींच्या शोध कार्यात मदत करणे, शालेय व सामाजिक क्षेत्रात निरनिराळ्या माध्यमातून अनेक सेवांचे आयोजन करण्यात सहज सेवा फौंडेशन अग्रेसर आहे.याच सामाजिक भावनेतून खोपोली व परिसरात अनाथ आबालवृद्ध आहेत,ज्यांना राहण्यास निवारा नाही व जे कष्ट करून आपली उपजीविका करू शकत नाही,ज्यांना इतरत्र मागून पोट भरण्याशिवाय काही पर्याय नाही,अश्या अनाथांना आता सहजसेवा फौंडेशन,खोपोली द्वारा दररोज दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान खास नियोजन केलेल्या फिरत्या वाहनातून नि:शुल्क भोजन देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आला.

जगात हा दिवस बऱ्याच ठिकाणी प्रेम दिवस अर्थातच vallentine Day म्हणून साजरा केला जातो,गतवर्षी सहज सेवा फौंडेशन,खोपोलीने मनोरुग्णाची स्वच्छता करून हा दिवस साजरा केला होता, यावर्षीही सामाजिक कार्याने पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या उपक्रमासाठी श्री. यशवंत लक्ष्मणशेठ साबळे,चंदूकाका जोशी व किशोर ओसवाल यांनी विशेष सहकार्य केले आहे.या शुभारंभ उपक्रमास सहजसेवा फौंडेशन, खोपोलीचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, खजिनदार संतोष गायकर,उपक्रम प्रमुख किशोर ओसवाल, सह-उपक्रम प्रमुख धनराज जंबगी,बंटी कांबळे,सलमान शेख,बी. निरंजन,सायली गायकवाड,अल्ताफ सय्यद,आयुब शेख,संदेश शेट्टे,रवी गौडा,अजय कांबळे,संदेश शेट्टे ,आमिर पठाण, आयुब खान,रोहित ढेबे,रोहित गायकवाड,दुर्गेश देवकर,महेश मेश्राम,बंटी कांबळे,साहिल शेख,सुवर्णा मोरे,जयश्री डोंगरे ,किशोर ओसवाल,निलेश जैन,राजेंद्र ओसवाल चंदूकाका जोशी,मोहन केदार,सत्यम ओसवाल, प्रवीण वाघमारे,सलमान शेख व खोपोली गावातील नागरिक उपस्थित होते.

आपण समाजात राहतो,त्या समाजासाठी आपण काही देणे लागतो या भावनेतून सहज सेवेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमातून गरजूंना लाभ होईल व हे सहज कार्य असेच निरंतन सुरू रहावे, या शुभेच्छा खोपोली शहरातील प्रथितयश व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर ओसवाल यांनी व्यक्त केले.

दररोज दुपारी 12.00 ते 01.00 च्या दरम्यान खास वाहनातून खोपोली गाव ते शीळफाटा परिसरात अनाथ लोकांना ही सेवा दिली जाईल.
आपणही अश्या व्यक्ती आढळल्यास 9975492470 या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन सहज सेवा फौंडेशन,खोपोलीचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button