Jalgaon

?जळगांव Live… फरार पोलीस नाईक अखेर ACB च्या ताब्यात..जळगाव येथे केली अटक…

?जळगांव Live… फरार पोलीस नाईक अखेर ACB च्या ताब्यात..जळगाव येथे केली अटक…जळगाव अमळनेर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला धरणगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पो नाईक विलास सोनवणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव येथे ताब्यात घेतले आहे. कारवाई दरम्यान विभागाचे व्हॉइस रेकॉर्डर घेऊन हा पो नाईक फरार झाला होता. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ ह्या फरार पोलिस नाईक विलास सोनवणे यास अटक करण्यात आली आहे.बांभोरी ता धरणगाव येथील भारत छगन पाटील यांच्याविरुद्ध भगवान हरी पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यात ते जामिनावर सुटले होते. या प्रकरणात निर्दोष सुटायचे असेल तर मला 19 हजार रुपये दे अन्यथा कोर्टात कडक रिपोर्ट पाठवेल असा दम पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यांनी भारत पाटील यांना दिला होता.या अनुषंगाने पाटील यांनी 5 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.विलास सोनवणेने भारत पाटील यांना पैसे देण्यासाठी 6 मार्च रोजी संध्याकाळी अमळनेर बसस्टँड जवळ बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंच घेऊन भारत पाटील यांच्या गळ्यात व पॅन्टच्या खिश्यात व्हॉइस रेकॉर्डर ठेवून 6 मार्च रोजी रात्री 10 वाजता बाजार समितीच्या गेट जवळ सापळा रचला होता. भारत पाटील याने काही रक्कम कमी करा असे सांगितले तेव्हा विलास ने तुम्हाला जे द्यायचे ते द्या असे नाराजीने सांगितले. यादरम्यान विलास सोनवणे यास संशय आल्याने त्याने भारतच्या छातीस हात लावून तपासणी केली असता सरकारी व्हॉइस रेकॉर्डर हाती लागले होते. विलास झटापट करून हे व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून पसार झाला होता.या प्रकरणात निरीक्षक नीलेश लोधी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिली होती. फरार असलेला संशयित विलास सोनवणे हा हाती लागत नव्हता पण जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ असल्याची गोपनीय माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिनेशसिंग पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहकार्‍यांना सोबत घेत विलास सोनवणे यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरिक्षक निलेश लोधी करीत आहेत.?जळगांव Live... फरार पोलीस नाईक अखेर Acb च्या ताब्यात..जळगाव येथे केली अटक...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button