Yawal

सावदा नगर पालिका शाळा समन्वय समितीच्या लेखी आश्‍वासनानंतर अखेर सुटले महिलेचे आमरण उपोषण

सावदा नगर पालिका शाळा समन्वय समितीच्या लेखी आश्‍वासनानंतर अखेर सुटले महिलेचे आमरण उपोषण

“सावदा नगरपालिकेत राजेश वानखेडे हे नगराध्यक्ष असताना सदर महिलेस अनुकंपा तत्वावर घेणे कामी शाळा समन्वय समिती न.पा.सावदा यांनी दि.१/८/२०१६ रोजी देखील ठराव केलेला असून त्याचे सुचक नगरसेवक राजेंद्र चौधरी व अनुमोदक रवींद्र बेंडाळे हे आहे. व त्या कालखंडापासून आज पावेतो यांच्यासह न.पा. विरोधी गटनेते फिरोज खान पठाण,व राष्ट्रवादीचे इतर नगरसेवक सदरील महिलेला न्याय मिळावा या भूमिकेत आहे.”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे नगरपालिका संचालित श्री आ.ग. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वरिष्ठ लिपिक पदावर असलेले आनंद मेढे यांचे निधन झाले असता स्वतःला त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर त्यांची पत्नी सुलभा आनंदा मेढे यांनी शाळा समन्वय समिती अध्यक्ष व सचिव यांच्याकडे वेळोवेळी लेखी व तोंडी अर्ज द्वारे मागणी केली असता तसेच त्यांचे नाव प्रतिक्षा यादीमध्ये प्रथम क्रमांकावर असून समन्वय समितीने या महिलेचा विचार न करता थेट सदरील प्रतीक्षा यादीतील क्रमांक तीन वरील श्रेयस प्रशांत जैन यांची नियुक्ती केली.

यानंतर गंभा. सुलभा आनंदा मेढे यांच्याकडे संबंधित शाळा समन्वय समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सदरची महिला अनुसूचित जातीची असल्याने त्यांच्यावर नगरपालिका ते जिल्हा परिषद जळगांव येथील संबंधित अधिकाऱ्याकडून अन्याय झाले असल्यामुळे ही महिला आज दि.८/११/२०२१ रोजी सावदा नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसली होती.

परिणामी शिक्षण अधिकारी यांच्या दि.३/११/२०२१ च्या पत्रावरून आमरण उपोषण थांबवणे बाबत शाळा समन्वय समितीने सदर महिलेस दिलेल्या पत्रात त्वरित सभा घेऊन त्यात नियुक्तीचा ठराव करून संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल. असा मजकूर नमूद असलेला लेखी पत्र आज दुपारी ३ वाजेनंतर आमरण उपोषणाला बसलेली श्रीमती सुलभा आनंदा मेढे यांच्या कडे जाऊन सध्याची शाळा समन्वय समिती अध्यक्ष, सह मुख्याधिकारी, नगरसेविका नंदाबाई लोखंडे, एपीआय इंगोले साहेब, व इतर नगरसेवक यांची उपोषणा ठिकाणी उपस्थित होती. तसेच मान्यवर बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्या समक्ष दिले.व आमरण उपोषण थांबविले.

मात्र नियम असताना न्याय मिळवण्यासाठी एका अनुसूचित जातीच्या महिलेला आमरण उपोषण करण्याची वेळ येते ही एक खेदाची बाब आहे.हे मात्र खरे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button