Bhusawal

वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगाव पूर्व नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी यांची बैठक संपन्न

वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगाव पूर्व नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी यांची बैठक संपन्न

भुसावळ भिमराव कोचुरे

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 10 ऑक्टोंबर 2020 रोजी पक्ष कार्यालय पंचशील नगर भुसावळ येथे दुपारी 2:00 वा. वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगाव पूर्व यांची बैठक पार पडली यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची ओळख होऊन पक्षाच्या पुढील भूमिकांत बाबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रत्येकाने आपापल्या सूचना बैठकीत मांडल्या सदर बैठक ही जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
ठराव क्र. 1 पुढील प्रमाणे असावा

वंचित बहुजन आघाडी च्या जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यां शिवाय इतर कोणीही पक्षाचा किंवा पदाचा वापर करू नये हा निकष महिला आघाडी व युवक आघाडी यांनाही लागू आहे कोणतेही आंदोलन किंवा निवेदने देण्यापूर्वी जिल्हाध्यक्षांशी विचार विनिमय करावा. पूर्वसूचना दिल्या शिवाय कोणतेही कार्यक्रम राबवू नये असा ठराव मंजूर करण्यात आला
2) सन 2020/21 च्या संभाव्य निवडणुकां बाबत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण साठी गट प्रमुख व गण प्रमुख यांच्या नियुक्त्या करण्याबाबत चर्चा करण्यात आली
3) तालुका व जिल्हा स्तरावर पक्ष कार्यालय निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली वरील संपूर्ण विषयांवर चर्चा झाली असून आयत्यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची व समस्यांचे निराकरण करण्यात आले व पक्षाच्या पुढील ध्येय धोरणांसाठी व पक्षबांधणीसाठी अलुतेदार बलुतेदार बांधवांना जास्तीत जास्त संख्येने समाविष्ट करण्याचे ठरवण्यात आले व संपूर्ण पदाधिकारी निवडीबाबत अभिनंदन पर ठराव करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा महासचिव दिनेश इखारे,विनोद पाडर, जिल्हा प्रवक्ता विनोद इंगळे,उपाध्यक्ष रफिक बेग, महेंद्र सुरळकर,जिल्हा सचिव दीपक मेघे,जिल्हा सदस्य धोंडू वाघ,सुनील पाटील,अरुण तायडे,सलीम शेख,भिकाजी असलकर,रामचंद्र साळुंके आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button