बहुजन समाज पार्टी येवला विधानसभेच्या वतीने एस टी महामंडळ च्या संपाला जाहिर पाठिंबा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक- महाराष्ट्र् राज्यभर चालु असलेल्या महाराष्ट्र् राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एस टी) म्हणजेच लाल परी असे हि संबोधले जाणारी आपली एस टी च्या कर्मचारी यांच्या चालू असलेल्य संपाला आज बहुजन समाज पार्टी येवला विधानसभा च्या वतीने एसटी कर्मचारी संपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. शासनाने तत्काळ कर्मचारी संपावर लक्ष द्यावे व सर्व मागण्या मान्य करून परत एस टी सुरळीत चालू करावी यसाठी बहुजन समाज पार्टी येवला विधानसभेच्या वतीने निवेदन देण्यात् आले आहे त्या प्रसंगी जिल्हा प्रभारी पौलस आहिरे जिल्हा कोषाध्यक्ष माधवराव गायकवाड, येवला विधानसभा प्रभारी धर्मा पगारे, प्रभारी . रवींद्र गायकवाड, येवला विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत निकम, महासचिव अभिमन्यू शिरसाठ, कोषाध्यक्ष प्रदीप गायकवाड, येवला विधानसभा सचिव इंजी. अक्षयकुमार जाधव, गीताराम घोडेराव,संदीप सोनवणे , मारूती जिरे, गौतम घुसळे यांच्या वतीने एसटी आगार प्रमुख यांना पाठिंब्याचे पत्रक देण्यात आले.






