मोहफ़ुल वेचण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाचा हल्ला
पत्नी वाघाच्या हल्यात ठार, पती थोडक्यात बचावला.
चिमूर तालुक्यातील सातारा येथील घटना
प्रतिनिधी चिमूर
ताडोबा व्याघ्र प्रकल्प जवळ असलेल्या कोलारा प्रवेश द्वारा शेजारी वसलेल्या सातारा येथील पती-पत्नी बुधवारी सकाळीच स्वतःच्या शेतात मोहफ़ुल वेचण्यासाठी गेले असता वाघाने महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना गावापासून जवळच शेतात घडली यमुना पांढुरग गायकवाड वय 57 वर्ष राहणार सातारा असे मृत महिलेचे नाव आहे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ताडोबा बफ्फर झोन व वनपरिक्षेत्र बफ्फर खडसंगी च्या सेंटर पॉईंट अंतर्गत संरक्षित वनक्षेत्र गट क्रमांक 143/7 जवळील शेतात सव्है.नं. 147 सातारा गावातील शेतकरी दाम्पत्य नेहमी प्रमाणे सकाळी सहा वाजताच्या दरम्यान मालकीच्या शेतात असलेल्या झाडाचे मोहफ़ुल वेचण्यासाठी गेले होते पती पांढुरग गायकवाड एका झाडात तर पत्नी यमुना दुसऱ्या झाडात मोहफ़ुल वेचित होते
दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने यमुना गायकवाड यांच्या वर हमला करून नरडीचा घोट घेत वाघ पत्नीला ओढत नेत असल्याचे थरकाप उडवणारा प्रसंग पाहून पती पांढुरग यानि धीर न सोडता वाघाचा पाठलाग केला व घटनास्थळा पासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर वाघाला काठीने मारले तेव्हा वाघाने पत्नीला सोडून पळ काढला मात्र तोपर्यंत पांढुरग च्या पत्नीची प्राणज्योत मावळली होती घटनेची माहिती गावकऱ्याना होतांच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती घटनेची माहिती वन विभागाला दिली असता खडसंगी बफ्फरचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, ताडोबा बफ्फर वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जि. शेंडे,ताडोबा एसीएफ खोरे,कोलारा क्षेत्र सहाय्यक आर जि कोडापे, वन अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले मात्र वनविभागाने वृत्त लिहेपर्यत मृतकाच्या कुटूंबियांना कुठलीही तातडीची आर्थिक मदत केली नव्हती






