युवक युवतींना उद्योजक होण्याची संधी
‘सह्याद्री फार्म्स-टाटा कॅपिटल’तर्फे प्रशिक्षण वर्ग
सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्टाईव्ह व टाटा कॅपिटल यांच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील युवक युवतींसाठी‘मिनी एमबीए’ अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम 10 दिवसांसाठी असून तो पूर्णपणे विनाशुल्क असणार आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ मोहाडी (जि. नाशिक) येथे जानेवारी महिन्यात हा अभ्यासक्रम होईल. यासाठी इयत्ता बारावी ऊतीर्ण असणे तसेच वयोमर्यादा 18 ते 35 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
हा अभ्यासक्रम निवासी स्वरुपाचा असेल. यात व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक कौशल्ये शिकवली जाणार आहे. या अभ्यासक्रमामुळे पोल्ट्री, बांबू कुटीरोद्योग, शेळीपालन, कृषि यांत्रिकीकरण व दुरुस्ती, पापड उद्योग, फॅब्रिकेशन वर्कशॉप, ट्रॅक्टर दुरस्ती, भाजीपाला निर्जलीकरण, बेदाणा उत्पादन, रोपवाटीका व्यवस्थापन, गोधडी बनविणे, लोणचे व मसाला निर्मिती, पेपर व कागदी बॅग निर्मिती या क्षेत्रात उद्योग करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
योग्य उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी बँका व पतसंस्थांकडून सुलभ पतपुरवठा मिळवण्यासाठी साह्य करणे. उद्योग सुरु केल्यानंतरही मार्गदर्शन करणे. आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी मदत करणे. यासाठी सर्वतोपरी साह्य केले जाणार आहे. तरी ग्रामीण व शहरी भागातील युवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘टाटा स्ट्राईव्ह सह्याद्री फार्म्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर तर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात <_ forms.gle=”forms.gle” _1qxq8bu5fpvfmwkt9=”_1qxq8bu5fpvfmwkt9″>
या लिंकवर जाऊन अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी देवेंद्र निंबोळकर यांच्याशी 8698411288 या क्रमांकावर संपर्क साधावा.






