India

Navratri-2022: Amazing Tradition: ह्या गावात पुरुष खेळतात साडी नेसून गरबा..!जपतात 200 वर्षे जुनी परंपरा..!

Navratri-2022: Amazing Tradition: ह्या गावात पुरुष खेळतात साडी नेसून गरबा..!जपतात 200 वर्षे जुनी परंपरा..!

भारत हा विविधी प्रथा-परंपरा, रीत-रिवाज असलेला देश आहे. आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवातही अशा काही अनोख्या प्रथा परंपरा दिसून येतात. गुजरातमधील अहमदाबाद येथील बडौत समजातील पुरुष नवरात्रीमध्ये साडी नेसून गरबा खेळतात. या सोहळ्यामध्ये पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.
नवरात्रीमध्ये जुन्या अहमदाबाद शहरामध्ये गरबा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.

बडौत समुदायातील लोक धुमधडाक्यात नवरात्रौत्सव साजरा करतात. या दरम्यान सादू माता मंदिरामध्ये पूजा केली जाते. बडौत समुदायाचे पुरुष नवरात्रीमधील आठव्या दिवशी रात्री राडी नेसून गरबा खेळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होतात.

बडौत समुदायाच्या पुरुषांकडून नवरात्रीदरम्यान दोनशे वर्षे जुनी प्रथा पाळली जाते. हे पुरुष साडी नेसून शृंगार करतात. त्यानंतर गरबा खेळतात.
सुमारे २०० वर्षांपूर्वी सादुबा नावाच्या महिलेने बडौत सुमदायातील पुरुषांना शाप दिला होता. नवरात्रीमध्ये त्याचंच प्रायश्चित केलं जातं. नवरात्रीदरम्यान, बडौत समुदायातील पुरुष मंडळी सादू मातेची आराधना करतात. तसेच तिची माफी मागतात.

बडौद समुदायातील मंडळीनी २०० वर्षे लोटल्यानंतरही ही परंपरा पाळली जाते. ते आनंदामध्ये नवरात्रौत्सव साजरा करतात. साडी नेसतात आणि गरबा खेळतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button