Amalner: नगरपरिषद तर्फे पर्यावरण पूरक तुरटीच्या गणपती माफक दरात उपलब्ध..!गणेशभक्तांनी लाभ घ्यावा..मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे आवाहन..!
अमळनेर नगरपरिषद तर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव या संकल्पने अंतर्गत तुरटीच्या ९ इंचापासून दीड फुटापर्यंतच्या गणेशमूर्ती माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली असून गणेशभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
तुरटी ही पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाते.तसेच तुरटी पाण्यात लवकर विरघळते त्यामुळे मूर्ती पाण्यात लवकर विरघळतात. आपल्या घरातील हौदात ओव्हरहेड टाकी किंवा योग्य त्या भाड्यांमध्ये मूर्ती विसर्जित करू शकता. यामुळे जलशुद्धीकरण होईलच त्यासोबतच मूर्तीची कुठलीही विटंबना होणार नाही.
प्रभाग क. (१७-अ) महिला राखीव श्रीकृष्ण नगर, वडचौक, अमळनेर
पालिकेतर्फे मूर्ती चे माफक दरात वितरण होणार असून तुरटीच्या मूर्ती संकलनासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे.तर शहरातील अंबर्शी टेकडीवरील पाणी शुद्धीकरण केंद्रात या मूर्तीचे विसर्जन पालिकेतर्फे केले जाणार असून जास्तीत जास्त गणेशभक्तांनी तुरटीच्या गणेशमूर्ती स्थापना करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.






