MaharashtraMumbai

?️ पहा माधुरी दिक्षितच्या बहिणी आहेत तिच्या सारख्याच सुंदर आणि नृत्यांगना..

?️ पहा माधुरी दिक्षित च्या बहिणी आहेत तिच्या सारख्याच सुंदर आणि नृत्यांगना..

आज 15 मे माधुरी दीक्षित चा वाढदिवस…

त्यानिमित्ताने तिच्या कुटुंबातील सदस्य आणि आयुष्यातील रंजक प्रवास..

प्रा जयश्री दाभाडे

मुंबई बॉलिवूड….

बॉलिवूडची सदाबहार, सुंदर हास्याने मोहित करणारी सौंदर्यवती माधुरी दीक्षितचा आज जन्म दिवस..ठोस प्रहार च्या परिवाराकडून माधुरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

माधुरी म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर उभी राहते एक अप्रतिम सौंदर्य,हास्य,आणि नृत्यांगना..माधुरी बद्दल तर आपण सर्वजण बरच काही जाणतो.तिचा जीवन प्रवास तिच्या आवडी निवडी..करियर.. मात्र तिच्या कुटुंबाबद्दल फारसं कोणाला माहीत नाही विशेषतः तिला दोन बहिणी आहेत आणि त्याही तिच्या इतक्याच सुंदर आणि उत्कृष्ट नृत्यांगना आहेत.

?️ पहा माधुरी दिक्षितच्या बहिणी आहेत तिच्या सारख्याच सुंदर आणि नृत्यांगना..

नुकतेच माधुरी दीक्षितने तिच्या बहिणीसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर वर शेअर केला आहे . या फोटो त दोघी बहिणी शाळेतील एका स्पर्धेत नृत्य करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये नक्की माधुरी कोणती आणि तिची बहीण कोणती हे ओळखणे थोडे मुश्कील आहे. आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षित च्या दोन बहिणी रुपा आणि भारती दीक्षित यांच्या बद्दल थोडी माहिती देणार आहोत.

रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित या दोन बहिणी व्यतिरिक्त माधुरीला एक भाऊ सुद्धा आहे. माधुरीच्या भावाचे नाव अजित दिक्षित असे आहे. माधुरीचे जगभरात इतके चाहते आहेत की तिच्याबद्दल विचार करताना लोक तिच्या कुटुंबाबद्दल विचार करणे विसरून जातात. याच कारणामुळे माधुरीच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती कोणाला ठाऊक नाही.

?️ पहा माधुरी दिक्षितच्या बहिणी आहेत तिच्या सारख्याच सुंदर आणि नृत्यांगना..

माधुरी सारख्याच तिच्या दोन्ही बहिणी सुद्धा उत्कृष्ट कत्थक डान्सर आहेत. असे म्हटले जाते की माधुरीला अभिनेत्री बनवण्यासाठी दोन्ही बहिणींनी त्याग केला आहे. रूपा आणि भारतीने कधीच बॉलिवुड मध्ये येण्याचा विचार केला नाही. माधुरीच्या दोघी बहिणी आता आप आपल्या जीवनात सुखी असून प्रसिध्दी पासून दूर आहेत.

माधुरी दीक्षितच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित असे आहे. शंकर दीक्षित हे पेशाने इंजिनियर होते शिवाय त्यांची स्वतः ची कंपनी सुद्धा होती. सप्टेंबर २०१३ ला वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर १९९९ मध्ये लॉस एंजेलिस कलिफॉर्निया येथील श्रीराम माधव नेने सोबत माधुरी विवाह बद्ध झाली.

माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे १९६७ ला झाला. गेल्या ३६ वर्षांपासून ती इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहे. माधुरीने अबोध या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र त्या चित्रपटाला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. मात्र या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. माधुरी ही अभिनेत्री सोबतच एक उत्कृष्ट नृत्यांगना सुद्धा आहे.

माधुरीने वयाच्या तिसऱ्या वर्षीच कत्थक शिकायला सुरूवात केली होती. आता माधुरी ही एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. माधुरी आणि श्रीराम यांना अरिन आणि रियान हे दोन मुलगे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button