Maharashtra

फैजपुर च्या अंबिका दूध उत्पादक सोसायटी तर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी स 51 हजाराची मदत

फैजपुर च्या अंबिका दूध उत्पादक सोसायटी तर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी स 51 हजाराची मदत

सलीम पिंजारी

फैजपूर– -कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांची मदतिचा धनादेश आज शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आला.

फैजपूर येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी तर्फे नित्याने समाजपयोगी उपक्रम राबविणे,संकटकाळी धावून येणे असे सेवाभावी कार्य ही संस्था करीत असते व दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे सध्या देशात कोरोनाचे संकट आहे म्हणून यानुसार च सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास ५१हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेऊन या मदतीचा शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द केला चेअरमन हेमराज चौधरी व व्हा नितीन राणे,संचालक चंद्रशेखर चौधरी व सेक्रेटरी सुनील क्षत्रिय यांनी ५१ हजार रुपये निधी मदतीचा धनादेश फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सुपूर्द केला यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पालिका कर निरीक्षक बाजीराव नवले हे उपस्थित होते दरम्यान दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे यानुसार च सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास ५१००० रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button