Nashik

? ठोस प्रहार ब्रेकिंग मद्यप्रेमीचां बांध फुटला, नाशकात ऊङाला सोशल ङिस्टींग चा फज्जा…तळीरामांचा एकच गोंधळ..

“.मद्यप्रेमीचां बांध फुटला, नाशकात ऊङाला सोशल ङिस्टींग चा फज्जा,,,तळीरामाचां एकच गोंधळ, ”

शांताराम दुनबळे

नाशिक राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली ( त्यामुळे आज ( 4 में ) पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले आहेत . नाशिक मध्ये सकाळी सहा वाजेपासून मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली . काही जण तर तीन चार तासांपासून रांगेत तात्कळत उभे आहे . अक्षरशा तळीराम दारू घेण्यासाठी तळ ठोकून बसले आहे . प्रत्येक जण चार ते पाच बॉटल खरेदी करणार असल्याची चर्चा तळीरामांनमधून निघत आहे . नाशिक शहरात रुग्ण संख्या मर्यादित असली तरी महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये आहे . रविवारी ( दि . ४ ) रात्री उशिरा जिल्हाधिका – यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि ऑरेंज झोनची यादी घोषित केली , त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत .रेङ झोन तालुके नाशिक नांदगाव येवला मालेगाव निफाङ चादंवङ सिन्नर तर ऑरेजं झोन मध्ये दिङोरी पेठ सुरगाणा ञ्यंबकेश्वर इगतपुरी कळवण बागलाण देवळा ह्या तालुक्याचां समावेश असुन त्यातअत्यावश्यक सेवा असणा – या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले आहे . झेरॉक्स व स्टेशनरी , हार्डवेअर , गॅरेज , वाहनांचे शो रूम , सर्व्हिस स्टेशन्स आणि अन्य अनेक दुकाने सुरू झाले आहे . विशेष म्हणजे शहरातील अनेक मद्य दुकाने सुरू होताच तळीरामांनी गर्दी केली होती . नाशिकरोड येथील दत्त मंदिर आणि जीपीओ जवळील एका मद्य दुकानात रांगा लागल्या असून , फिजिकल डिस्टसिंगचा पूर्णत : फज्जा उडाला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button