Rawer

सालाबादाप्रमाणे या वर्षीही राबविला संकल्प.

सालाबादाप्रमाणे या वर्षीही राबविला संकल्प.

निंभोरा-संदिप कोळी
येथील युवाशक्ती मित्रपरिवारातर्फे या वर्षी ही सालाबादाप्रमाणे वाघोदा रस्त्यावरील स्मशानभूमीत सफाई अभियान राबविण्यात आले.यावेळी अस्ताव्यस्त पडलेले अपूर्ण जळालेली लाकडे, काड्या,पालापाचोळा, दशक्रिया विधीची कापलेली केस,राख,फुटलेले मटके,सुकलेली फुलहार, प्रेतावरील शाल अशा वस्तू पडलेल्या होत्या त्यांना जाळणे,राखेचे ढीग बाजूला करणे आदी सफाईची कामे यावेळी युवकांतर्फे करण्यात आली.यावेळी त्यात हर्षल ठाकरे,सुनिल कोंडे,विवेक बोंडे,चेतन महाले,राज खाटीक,नवाज पिंजारी,दिनेश कोंडे,योगेश सपकाळे यांसह आदी युवक उपस्थित होते.
सुनिल कोंडे यांचेकडून स्मशान भूमीत प्रेतासाठी ब्रॅकेट देण्याचा संकल्प-
वाघोदा रस्त्यावरील स्मशान भूमीत प्रेत जाळण्यासाठी असलेले ब्राकेट तप्त ज्वालांमुळे निकामी झाले असून त्या ओट्यावर आता प्रेत जळण्यासठी ब्रॅकेट नाहीत त्या जागी दोन ब्राकेट देण्याचा संकल्प यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे यांनी केला.

या आधी युवा रसिक मंडळ व स्वानंद कृषी विज्ञान मंडळ यांचा कित्ता गिरवत यंदा युवाशक्ती मित्र परिवारातर्फे स्मशानभूमी सफाई अभियान राबविण्यात आले.तरुणांना एक वेगळा संदेश यातून प्रयत्न आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button