Maharashtra

नगरपरिषदेचा “सहीराम” “खोडवेला” “खोडला”…. अब किसकी बारी? उत्सुकता आणि प्रश्नही

नगरपरिषदेचा “सहीराम” “खोडवेला” “खोडला”…. अब किसकी बारी? उत्सुकता आणि प्रश्नही….

नगरपरिषदेचा "सहीराम" "खोडवेला" "खोडला".... अब किसकी बारी? उत्सुकता आणि प्रश्नही
अमळनेर 
नगरपरिषदेच्या काही प्रशासकीय खात्यांमध्ये तसेच  आर्थिक इतर महत्वाच्या कागदपत्रांवर बेकायदेशीर पणे काही कर्मचारी सह्या करीत असल्याची तक्रार उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनकडे केली होती. याची बातमीद्वारे  महाराष्ट्र मराठी 7 बातमीपत्राने सविस्तर पणे आणि स्पष्ट शब्दात हजेरी घेतली होती.
उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या तक्रारीची  जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून  करनिर्धारण पदावर कार्यरत भडगाव नगरपरिषदेचे नागेश आंबादास ‘खोडवे’ यांच्याकडे सोपलेला अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे.यासंदर्भात जिल्हा प्रशासन अधिकारी उत्कर्ष गुटे मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, अमळनेर नगरपरिषदेत करनिर्धारण व प्रशासकीय सेवेतील कर्मचारी नागेश आंबादास खोडवे हे नगरलेखापाल या आर्थिक व महत्वाच्या पदावर सह्या करीत आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार आणि महाराष्ट्र शासन राजपत्र ३० जानेवारी २०१८ अनुसार बेकायदेशीर असून याबाबत चौकशीची मागणी केली होती
याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी उत्कर्ष गुटे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागेश आंबादास खोडवे कर निर्धारण प्रशासकीय सेवा श्रेणी-क नगरपरिषद भडगाव यांच्याकडे अमळनेर नगरपरिषदेतील कर निर्धारक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात होता.तथापि नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडील आदेशान्वये अमळनेर नगरपरिषदेसाठी जगदीश दौलत पदमर , संदीप देवजी गायकवाड, नेहा हरीषचंद्र पाटील हे कायमस्वरूपी कर निर्धारक आपल्या नगरपालिकेस देण्यात आले असल्याने, खोडवे यांच्याकडे सोपवण्यात आलेला अमळनेर नगरपरिषदेतील कर निर्धारण प्रशासकीय सेवा पदाचा अतिरिक्त कार्यभार या पत्रान्वये काढून घेण्यात येत आहे. खोडवे यांनी आपल्या मूळपदावर पूर्ण वेळ काम करावे, अशा सूचना केल्या आहेत. 
 तसेच उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी सबओर्शियर आस्थापनेवर नियुक्त एस. टी. पाटील हे नगरअभियंता आस्थापनेच्या अभियंता पदावर बांधकाम परवानगी, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, ना हरकत दाखलयांवर सह्या करीत आहेत तसेच लिपिक पदावरील नितीन खैरनार हे अग्निशमन अंतर्गत नगर अभियंता या पदावर कार्यरत असून सह्या देखील करीत आहेत, अशीही तक्रार केली होती. त्यामुळे खोडवेंचा पदाभार काढला मग पाटील, खैरनार यांच्या पदभार देखील काढून घेणार का अशी उत्सुकता लागून राहिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button