Chandwad

भोयेगाव येथे शिक्षकांनी स्वखर्चाने CCTV व Thumb मशीन बसविले

भोयेगाव येथे शिक्षकांनी स्वखर्चाने CCTV व Thumb मशीन बसविले

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा भोयेगाव, तालुका चांदवड (नाशिक)
शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वयं स्फूर्ती ने स्वखर्चाने CCTV व शिक्षक – विद्यार्थी उपस्थिती नोंदीसाठी Thumb मशीन बसविले.
(एकूण खर्च : 45, 200/- CCTV & Thumb मशिन ) आलेला आहे. कोरोना कालावधीत शाळेला जास्त दिवस सुट्टी असल्यामुळे. सुसज्ज इमारतीच्या खिडक्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीने फोडल्या. सर्व शिक्षकांना याचे खूप वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय योजना केली पाहिजेत या उद्देशाने मा.गटशिक्षणाधिकारी आर एन निकम यांचे मार्गदर्शनाखाली शाळेत CCTV बसवण्याची कल्पना पुढे आली. सर्व शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने 45200/- रुपये किमतीचे CCTV & Thumb मशिन बसविले. शिक्षकांचे दात्तृत्व खरोखरच प्रेरणादायी आहे. तसेच शालेय उपस्थिती नोंदविण्यासाठी स्वतःहून Thumb मशिन बसविले आहे.
सध्याच्या युगात CCTV व Thumb मशीन पासून दूर राहण्यापेक्षा आपल्या कार्यतत्परता व नवनिर्माण क्षमता असणाऱ्या सर्व शिक्षकांच्या अप्रतिम कार्यास त्रिवार वंदन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button