Amalner: एन एस एस तर्फे यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्त अभियान..
अमळनेर श्री. संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवात बोरी नदीच्या पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले.या वेळी तीन घंटा गाड्या भरून प्लास्टिक गोळा करण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात खानदेश शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन प्रदीप कुंदनलाल अग्रवाल,
आधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, जॉईंट सेक्रेटरी धीरज वैष्णव, उपप्राचार्य जयवंत पटवर्धन, उपप्राचार्य गुलाब निकम. उपप्राचार्य पराग पाटील, जूनियर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. डॉ. ए.जे. पाटील, प्रा. अवित पाटील, प्रा डॉ. हेमंत पवार, प्रा. एस. एम. राजपूत, प्रा. भाग्यश्री जाधव, धनदाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य. किशोर पाटील, चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल निकम, समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्राचार्य. पी एस पाटील. व प्रा. कविता पाटील तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक प्रा. डॉ. दिलीप भावसार माजी आधिसभा सदस्य दिनेश नाईक, राजेंद्र निकुंभ, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय
येथील डॉ. एस बी. सावंत, किसान महाविद्यालयातील पारोळा डॉ. प्रदीप औजेकर. मारवड महाविद्यालयातील डॉ. पवन पाटील, डॉ. दिलीप कदम, दिनेश अग्रवाल, अथर्व करंजे तसेच योगा ग्रुपच्या महिला भगिनी उर्मिला अग्रवाल, सुनिता करंजे, मीना कुमारी अग्रवाल, प्रा. शीला पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अॅड. भारती अग्रवाल, ज्योती भावसार, वनश्री अमृतकार, सुरेखा खैरनार, सोनल गोसलिया, नगर पालिका प्रशासनाचे संजय चौधरी, हैबत पाटील, दिनेश जोशी, कर्मचारी वुंद यांचे अनमोल सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा रा. से. यो समन्वयक प्रा. डॉ. मनीष करंजे, विभागीय
समन्वयक डॉ. संजय शिंगाणे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वयंसेवक स्वयंसेविका, यांनी परिश्रम घेतले.






