Mumbai

Mumbai Diary: शिवतीर्थ वर ठाकरेंचाच आवाज..! एकनाथ शिंदे ची बिकेसी वर तयारी सुरू..!

Mumbai Diary: शिवतीर्थ वर ठाकरेंचाच आवाज..! एकनाथ शिंदे ची बिकेसी वर तयारी सुरू..!
शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिका ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाचा अवलंब करण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली नाही, तर ते वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजन करण्याच्या तयारीत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सांगितले.

दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पैठण येथील सभेला उपस्थित असलेली गर्दी हे बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आमचीच असल्याचे स्पष्ट लक्षण असल्याचे सांगितले. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद शिवसेना आमदार भरत गोगावले म्हणाले की, “आम्ही शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन ठिकाणी परवानगीसाठी अर्ज केला आहे. जिथे परवानगी मिळेल तिथे भव्य दसरा मेळावा होईल.”

“त्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे. शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्यास आम्ही बीकेसी येथे मेळावा घेऊ, पण आमचे प्राधान्य शिवाजी पार्कला आहे. शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली, तर मेळावा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. शिवाजी पार्कबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असे गोगावलेंनी स्पष्ट केले.

दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे गटाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. “आम्ही सर्व बाबींवर अंतिम निर्णय घेऊ आणि जनतेला दाखवून देऊ की बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यांचा दसरा मेळावा कसा आयोजित करतात.” असंही गोगावले म्हणाले. इतर पक्षातील नेत्यांना मेळाव्यात आयोजित करण्याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असंही गोगावलेंनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शिवाजी पार्कवर पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटानेही त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेसाठी अर्ज केला होता. नंतर बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावरही शिंदे गटाने परवानगीसाठी अर्ज केला. शिवाजी पार्कवर विजयादशमी अर्थात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी बीएमसीने अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button