Dhule

शाँक लागून दुर्देवाने मृत्यू पावलेल्या लव्यम रेलनच्या परिवारास आमदार फारूक शाह यांचे चिरंजीव सेहबाज फारूक शाह यांच्या हस्ते महाविज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त…

शाँक लागून दुर्देवाने मृत्यू पावलेल्या लव्यम रेलनच्या परिवारास आमदार फारूक शाह यांचे चिरंजीव सेहबाज फारूक शाह यांच्या हस्ते महाविज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त…

या प्रकरणात २ कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते निलंबित..

Dhule : काही महिन्यांपूर्वी धुळयातील कुमार नगरात खांबात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे बालकाचा विद्युत पोलला स्पर्श होवुन अंगणात खेळणाऱ्या गोंडस मुलगा लव्यम रेलनचा दुर्देवाने बळी गेला होता. या घटनेने शहरात व कुमारनगर भागात महावितरणच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत दोषींवर कारवाईची मागणी होत होती. यावेळी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी लव्यम रेलनच्या परिवारासची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. आमदार शाह यांनी तत्कालीन उर्जा मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देत घटनेत दोषी असलेल्या जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून लव्यम रेलनच्या परिवारास मदत दयावी असे निवेदन दिले होते व महाविज वितरण कंपनीची बैठक घेतली होती त्यात आमदार फारूक शाह यांच्या दणक्याने २ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.
आज याच प्रकरणात लव्यम रेलनच्या परिवारास आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नाने महाविज वितरणने मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश आमदार फारूक शाह यांचे चिरंजीव सेहबाज फारूक शाह यांच्या हस्ते देण्यात आला. धनादेश देतेवेळी महाविज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. के. एस. बेळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. टी. पवार, महेंद्र रेलन, निशांत रेलन, सेहबाज फारूक शाह, परवेज शाह, निलेश काटे आदी उपस्थित होते. यासाठी महाविज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. के. एस. बेळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. टी. पवार यांचे सहकार्य लाभले.

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button