Amalner:जैन सोशल ग्रुप तर्फे किडनी मूत्ररोग विकार शिबीर संपन्न..! शेकडो रुग्णांनी घेतला लाभ..!
अमळनेर येथे जैन सोशल ग्रुपतर्फे आयोजित किडनी आणि मूत्ररोग विकार मोफत शिबिरात सुमारे दीडशे रुग्णांची मोफत तपासणी
करण्यात आली.
सेवा मेडिकल येथे रविवार दि 22 रोजी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात धुळे येथील किडनी व मूत्ररोग विकार तज्ञ डॉ. आशिष छाजेड यांनी रुग्णांना मार्गदर्शन करून तपासणी केली. यावेळी किडनी रोग, प्रोस्टेट, मूत्ररोग, किडनी कॅन्सर, मुतखडा आदी आजारांची तपासणी करण्यात आली. तर मूतखडासाठी सर्वात आधुनिक उत्तर महाराष्ट्रातील पहिले थुलियम लेसरद्वारे तपासणी यावेळी मोफत करण्यात आली.ही तपासणी खर्चिक असून सामान्य गरजू लोकांना न परवडणारी आहे. शिबिरातील गरजू रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत संलग्न हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार मोफत होणार आहेत. या शिबिरात मोफत युरोफ्लोमेट्री चाचणीही करण्यात आली.
शिबीर यशस्वीतेसाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिनेश लोढा, सेक्रेटरी वृषभ पारख, प्रोजेक्ट चेअरमन देवांग शाह, गोकुळ पारख, सचिन पारेख तसेच पूनम कोचर, राजेश बेदमुथा, सौरभ जैन, सचिन चोपडा, प्रितेश जैन,प्रशांत पारख, आदेश पारख, कीर्ती कोठारी यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.






