Pandharpur

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दोन लाख १हजार रुपये देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दोन लाख १हजार रुपये देणगी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस दोन लाख १हजार रुपये देणगी. पंढरपूर(प्रतिनिधी) मुंबई येथील सुधा लक्ष्मी सेन (रा. एम जी रोड, गोरेगाव, मुंबई)यांच्या वतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवी मंदिरास दोन लाख १हजार रुपये देणगी देण्यात आली.यावेळी देणगीदार सुधा लक्ष्मी सेन यांचा मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांनी श्री, ची प्रतिमा,पुष्पहार, श्रीफळ,उपरणे आदी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तसेच मंदिर समिती कर्मचारी उपस्थित होते.तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात आता पुन्हा भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, शनिवार, रविवार, सुट्या आणि एकादशी यावेळी खाजगी वाहने, एस टी बसद्वारे हजारो भाविक पंढरपूर येथे येत आहेत. कोरोना संसर्ग आता कमी होत आहे व लसही आली असल्याने कोविडची भीती कमी होत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दोन लाख १हजार रुपये देणगी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button