Maharashtra

दोन शिवभोजन थाळी केंद्र सुरू करणार तहसीलदार मिलिंद वाघ

अमळनेर योगेश पवार

तालुक्यात दोन शिवभोजन
थाळी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी
तहसील कार्यालयातर्फे पुरवठा शाखा येथे अर्ज
मागविण्यात आले आहेत. दि.११ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे.

तालुक्यासाठी शिवभोजन थाळीचे १५० थाळीसाठी दोन केंद्र असणार आहेत. त्यात ७५ थाळी संख्येच्या मर्यादित २ केंद्र स्थापन करण्यात येतील. या ठिकाणी बाहेरगावावरून येणाऱ्या नागरीकांसाठी भोजनाची
व्यवस्था करण्यात येणार असल्याने दि.१ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार गरीब व गरजू जनतेला वर्दळीच्या ठिकाणांसाठी केंद्र निश्चित करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी शियभोजन थाळी केंद्रासाठीचे अर्ज अमळनेर येथे तहसिल कार्यालयात
पुरवठा शाखेत दि.११ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावे. या दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शिवभोजन थाळीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी व शर्ती बाबतची सविस्तर
माहिती तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ५ किलो मोफत
तांदुळ वितरण

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पंतप्रधान यांनी २१ दिवसाचे लॉकडाऊन लागु केलेले आहे. सदर कालावधीत नियमीत धान्य घेत असलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांकररिता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ५
किलो मोफत तांदुळ वितरण करण्यासाठी प्रत्येक
गावासाठी ग्रामस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे.
त्यात तलाठी हा सदस्य सचिव असून सरपंच, पोलिसनपाटील, ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी हे सदस्य
आहेत. तसेच नगरपरिषद हद्दीमध्ये नियमीत धान्य घेतबअसलेल्या पात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकांकरीतानप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत येणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीस किलो ५ मोफत तांदुळ वितरणाकामीननगरपरिषदेचे नगरसेवक व नगरपरिषदचे कर्मचारी हे
सदस्य आहेत. धान्य वितरण करताना काही
अनियमितता आढळल्यास त्याबाबतीत माहिती त्वरीतबसादर करावी. तसेच महिन्याचे वाटप झाल्यानंतर सविस्तर अहवाल पुरवठा शाखा कार्यालयास महिना
अखेर सादर करावा. असे पत्र तहसीलदार वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button