Amalner

Amalner:  आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू..!

Amalner: आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू..!

अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ३० रोजी घडली.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रमशाळेत संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेताना 1 ली चा विद्यार्थी पंकज जमादार वळवी, वय ७ वर्ष, रा.केलीपाणी ता. तळोदा जि. नंदुरबार हा दिसला नाही त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. आजूबाजूला बराच वेळ शोध घेतल्यानंतर शाळेच्या बाजूला असलेल्या अतुल शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीत हा विद्यार्थी पडल्याचे लक्षात आले. त्याचे प्रेत वर तरंगत असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची खात्री झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.दरम्यान गावकऱ्यांनी खाटेला दोर बांधून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी भरत कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button