?Big Breaking..बेमोसमी पावसाचा राज्यात कहर.. विदर्भ,मध्य महाराष्ट्र,कोकणाला पावसाचा इशारा..थंडीत ही होईल वाढ..
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अद्यापही मुंबईवर आहे. सलग तिस-या दिवशी आजही शनिवारी मुंबईमध्ये ढगाळ हवामान येथील हवामान ढगाळ नोंदवितानाच कमाल आणि किमान तापमानातदेखील कमालीच चढ उतार नोंदविला गेला आहे.
शुक्रवारी झालेला पाऊस आणि हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली असून, सोमवारनंतरच मुंबईकरांना मोकळ्या आकाशासह सुर्यनारायणासह दर्शन होणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऐन डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पहाटेपासूनच मुंबई सह ठाणे , पालघर , रायगड जिल्ह्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. तसेच वातावरणही संपूर्ण ढगाळ आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील काही भागांत अशाच प्रकारे पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्षानं येत्या दोन दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडून रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमधील हवामान रविवारीदेखील ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात चढ उतार नोंदविण्यात येतील.
गेल्या तीन दिवस हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी खाली घसरले. आता मात्र यात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.






