Surgana

पोस्ट कार्यालयातील तिजोरी चोरटयाला गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड.महागडे मोबाईल, गुन्हयात दुचाकी हस्तगत.

पोस्ट कार्यालयातील तिजोरी चोरटयाला गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड.महागडे मोबाईल, गुन्हयात दुचाकी हस्तगत.

सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पोस्ट कार्यालयातील लोखंडी तिजोरीच चोरट्यांनी 18/3/2020 रोजी उचलून नेली होती. तिजोरी फोडता न आल्याने तिजोरी चिल्हारपाडा शिवारात एका कोरड्या नाल्यात फेकून चोरटय़ांनी पळ काढला होता. तिजोरी मधील दोन लाखापेक्षा जास्त रक्कम,रेव्हेन्यू स्टँप, पोस्टाची शंभरावर एटीएम कार्ड सही सलामत मिळाली होती.मात्र
आजवर शहरात अनेक घरफोडय़ा झाल्या मात्र पोलिस यंत्रणे कडून अज्ञात चोरटय़ा विरुद्ध गुन्हे दाखल करण्या पलीकडे स्थानिक पोलीस यंत्रणा काही करु शकत नाहीत. चोरांपुढे पोलिस यंत्रणाच हतबल होऊन जाते की काय, पोलीसां कडून गुन्हयाची उकल का होत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.गुन्हा घडताच कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. सदर घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी घेत गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना चोरट्यांचा तपास करुन तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. गेल्या सहा महिन्यांपासुन शहरात भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट झाला होता. याची दखल घेत गुन्हा शाखेचे पथक तीन दिवसा पासून शहरात तळ ठोकून होते.मागील एक वर्षापुर्वी मोबाईल चोरी प्रकरणात असलेला सराईत गुन्हेगार कमलाकर दता पवार वय -21 रा.सुरगाणा शहर दवाखानापाडा यास चौकशी करीता ताब्यात घेण्यासाठी दवाखानापाडा येथे गेले असता त्याने गुजरात कडे जाणा-या रस्त्याने पळ काढला. पोलिसांनी पाच किमी सिने स्टाइलने पाठलाग करून पकडले त्यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दखवताच त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.

त्याच्या कडुन पाच महागडे मोबाईल, वीस पेक्षा जास्त वेगवेगळ्या कंपन्याचे सिमकार्ड, गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल क्र.-एम.एच-15,जी.झेड- 6843 असा त्र्याहतर हजाराचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी कमलाकर पवार सह चार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. उर्वरित आरोपींचा तपास सुरू असुन त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. सदर गुन्हा उघडकीस आणणे कामी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.शिंपी, रामभाऊ मुंडे, पो. हवालदार हनुमंत महाले,प्रकाश तुपलोंढे, जयवंत सुर्यवंशी, वसंतराव खांडवी, गृह रक्षक दलाचे जवान शांताराम देशमुख, दिनकर धुम,स्थानिक पोलीस हेमंत भालेराव.जोपळे आदिंनी कारवाई केली.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे,सपोनि बोडके हे करीत आहेत.
फोटो- पोस्ट कार्यालयातील तोजोरी पळविण्याच्या गुह्यात वापरलेली दुचाकी व महागडे मोबाईल सराईत गुन्हेगाराकडून हस्तगत करतांना गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी.

शहरात होणा-या चो-या,घरफोडय़ा रोखण्या करीता सर्व सामान्य नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते.मात्र सुरगाणा शहरातून चौकशीसाठी संशयित म्हणून जरी एखाद्याला ताब्यात घेतले तरी अनेकजण सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मंडळी शासकीय कामात अडथळा आणतात. जबरदस्तीने चौकशी करीता का ताब्यात घेतात.त्याने गुन्हा केला नाही अशी शिफारस राजकीय मान्यवरांकडून केली जाते.अप्रत्यक्ष रित्या चोराला पाठबळ दिले जाते.शासकीय कामात अडथळा आणून पोलिस यंत्रणेवर दबाव आणला जातो. त्यामुळेच चोरांना पाठबळ मिळते.असे न करता तपास कामी पोलीस यंत्रणेला सहकार्य केल्यास निश्चितच शहरातील चो-यांना कायम स्वरुपी आळा बसणार.”
एस. एस.शिंपी
सपोनि- गुन्हे शाखा नाशिक.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button