Amalner

Amalner: 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होमगार्ड पथक अमळनेर तर्फे भव्य तिरंगा बाईक रॅली ठरली लक्षवेधी

Amalner: 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होमगार्ड पथक अमळनेर तर्फे भव्य तिरंगा बाईक रॅली ठरली लक्षवेधी

अमळनेर

75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या “हर घर तिरंगा” अभियंतातर्गत शहरात होमगार्ड पथक अमळनेर तर्फे पोलीस स्टेशन अमळनेर येथे वृक्षारोपण करून तिरंगा मोटर सायकल रॅली सकाळी संपूर्ण अमळनेरचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
महासमादेशक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा आदेश आणि जिल्हा समादेशक अधिकारी चंद्रकांत गवळी साहेब ,प्रशासकीय अधिकारी श्री जाधव साहेब, केंद्रप्रमुख तडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक अरुण नेरकर यांच्या माध्यमातून होमगार्ड पथक अमळनेर तर्फे ही भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. देशाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.सकाळी 7 वाजता अमळनेर पोलीस स्टेशन येथून या रॅलीला देशभक्तीपर घोषणाबाजी करत रॅलीला सुरुवात झाली,रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या होमगार्ड पथकातील पुरुष व महिला भगिनींनी “वंदे मातरम”, “भारत माता की जय”अश्या जोरदार घोषणा देत ही बाईक रॅली सकाळी शहराच्या दिशेने निघाली.रॅलीत ठिकठिकाणी नागरिकांनी व लहान बालकांनी सॅल्यूट करून जल्लोषात स्वागत केले,

ढेकु रोड, पिंपळे रोड, तहसील कार्यालय, पाचपावली देवी चौक,पवन चौक, झामी चौक, माळी वाडा,भोई वाडा, कसाली मोहल्ला,वाडी चौक, पान खिडकी ,सराफ बाजार, दगडी दरवाजा, तिरंगा चौक येथे विश्रांती घेत तिरंगा चौकात फोलिंग करून राष्ट्र ध्वजला सलामी दिली. शेवटी तहसील कार्यालय येथे देशभक्तीच्या घोषणा देऊन समारोप करण्यात आला.

यावेळी रॅलीत तालुका समादेशक अरुण नेरकर ,पलटण नायक उषा पाटील, भिमराव संदांशिव,देविदास पाटील,कमलेश वानखेडे,जितेंद्र महाजन,जितेंद्र पवार,रोहिदास शिंगाने,रवींद्र शिरसाठ,राहुल भाल्डे,विष्णू पाटील सह पथकातील होमगार्ड पुरुष व महिला होमगार्ड हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button