Faijpur

विद्यापीठस्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळचे उदघाटन

विद्यापीठस्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळचे उदघाटन

फैजपूर:-सलीम पिंजारी

पोवाडा गायनांने व्यक्तीच्या उत्साहात वाढ होवून, समाजात नवचैतन्य व जनजागृती घडवून आणल्या जाते.असे मत प्र.कुलगुरू डॉ पी. पी. माहुलीकर यांनी विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळच्या उद्घाटन समारंभात प्रसंगी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, संचलित धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्र. कुलगुरू प्रा डॉ पी पी माहुलीकर होते. अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, मा श्री. दिनेशजी उत्तम खरात- अधिसभा सदस्य, उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे, शाहीर शिवाजी पाटील, शाहीर विनोदजी ढगे,(पथनाट्यकार)डॉ जी जी कोल्हे- विद्यार्थी विकास अधिकारी ,प्रा व्ही. बी पाटील – आयोजन समिती सदस्य, डॉ.कल्पना पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रजवलन करून झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जी जी कोल्हे विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले उद्घाटनप्रसंगी प्रा पी पी माहुलीकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा या करिता विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक कला कौशल्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात.विद्यार्थी हा एकमेकांचे पाहून शिकतो. पोवाडा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे त्यासाठी विद्यापीठात कला अकेडमी स्थापन केली जाणार आहे.नवीन शिक्षण धोरणाची माहिती विद्यार्थांना दिली.

विद्यापीठस्तरीय पोवाडा गायन कौशल्य कार्यशाळचे उदघाटन

मा श्री दिनेशजी खरात यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना जास्तीत जास्त वाव मिळावा यासाठी असे कौशल्य कार्यशाळा घेतल्या जातात. पोवाड्यामध्ये अनेक शाहीर स्त्रियाही पुढे आल्या आहेत,स्मिता पाटील यांनी पोवाडयाच्या माध्यमातून आपले नाव कमावले. पोवाडयाचा माध्यमातून का असे ना आदिवासी समाजातील लोकनृत्य, लोकप्रिय गीते म्हटल्या जाते, या माध्यमातूनच हागणदारी मुक्त भारत ,हे अभियान समाजात रुजविली जाते शिवाजी महाराज व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्य कर्तृत्वाचे अनेक पोवाडे गायिले आहे.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी पोवाडा कौशल्य कार्यशाळा विद्यापीठ स्तरावर आमच्या महाविद्यालयात होत आहे.या भागात लोकांना जनजागृती व एकत्र करण्यासाठी शाहीर साबळे यांनी पोवाडे गायन केले होते. त्यासाठी विद्यार्थामध्ये आवड, जिद्द, आणि चिकाटी असणे आवश्यक आहे असे प्रतिपदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता काचकुटे तर आभार प्रा डॉ कल्पना पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा हरीष नेमाडे प्रा. सतीश पाटील डॉ रवी केसुर डॉ ताराचंद सावसाकडे, जयेश पाटील साक्षी पाटील, लक्ष्मी बोंडे यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button