Chandwad

जलजीवन मिशन योजनेबाबत जिल्हा परिषदेत बैठक

जलजीवन मिशन योजनेबाबत जिल्हा परिषदेत बैठक

उदय वायकोळे चांदवड

आज दि 14 जून 2023 रोजी आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड देवळा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजने च्या अडचणींसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद नाशिक येथे मतदारसंघातील स्थानिक ग्रामपंचायतिचे पदाधिकारी व जल जिवन मिशन योजनेचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

यावेळी विविध गावांमधून पाण्याचा स्रोत निर्माण करणे, वाड्या वस्त्यांना जोडणी करणे.. विहिरींचे कामे करणे, जलकुंभ बांधणे अश्या विविध अडचणी संदर्भात सदर बैठकीत चर्चा झाली.

येत्या 21 व 22 जून रोजी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग, जि.प नाशिक, प्रकल्प संचालक जल जिवन मिशन यांना चांदवड व देवळ यातील कामांच्या अडचणी संदर्भात पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
यावेळी जि प च्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती.आशीमा मित्तल, प्रकल्प संचालक श्रीमती.प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता श्री.संदीप सोनवणे, उपकार्यकारी अभियंता श्री.विनोद देसले, उपकार्यकारी अभियंता बोरसे मॅडम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button