Kolhapur

अनंतशाती संस्थेमार्फत मातृभाषा दिन डोगरांळ भागातील मुलासोबत साजरा

अनंतशाती संस्थेमार्फत मातृभाषा दिन डोगरांळ भागातील मुलासोबत साजरा

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : मातृभाषा ही पिढ्यानपिढ्या आपल्या देशाला लाभलेली एक अनमोल देणगी आणि वरदान आहे. आपल्या देशातील थोर साहित्यिक यांनी आपल्या मातृभाषेत लिखाणाचा अविस्मरणीय असा ठेवा आपल्या पुढील पिढीला दिला आहे.असे मत अनंत शांतीचे संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव यांनी व्यक्त केले.ते दुर्गम वाड्या वस्त्या येथिल शालेय विध्यार्थ्यांना थोर विचारवंताचे चरिञ मराठी अंकलपी व पेन वितरण प्रसंगी बोलत होते.निमित्य होते मातृभाषा दिनाचे
ते पुढे म्हणाले अजूनही दुर्गम वाड्या वस्त्या सर्व सोयींनी वंचित आहेत. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्दात भावनेने हा राबवलेला एक छोटासा उपक्रम आहे.असे समाजहिताचे उपक्रम अनंतशांती गेले१३ वर्षे राबवत आहे.

आंतरराष्ट्रीय मातृभाषेचे आस्तित्व पोहचवणे या उद्देशाने अनंतशाती बहूउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेमार्फत राधानगरी तालुक्यातील डोगंराळ,वाडी वस्त्यावरील मिसाळवाडी,डीगेवाडी, कुडूत्री,दळवेवाडी,आदी गावातील व वाड्यातील वि६ विदयार्थ्यांना मराठी भाषे विषयी प्रेम आपुलकी वाढावी म्हनुन थोर विचारवंताचे चरिञ व मराठी अंकलपी पेन या साहित्याचे वितरण करण्यात आले.त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. अंनतशांतीचे या आधी वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक ग्रामिण व डोंगराळ महिला सबलीकरण आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवून अनमोल अशी समाज सेवा केली आहे.
या वितरण कार्यक्रमास अंतशांतीचे संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव,पत्रकार सुभाष चौगले,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री गुरव यांनी तर आभार सुभाष चौगले यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button